महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं निधन झालं आहे. मंगळवारी (5 ऑगस्ट) वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी दिल्लीतील राम मनोहर लोहिया (RML) रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते.
https://x.com/ANI/status/1952643366279061747?t=7Y3jHGgQ2YWlsZapmBai-A&s=19
सत्यपाल मलिक यांनी जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 हटवण्याच्या ऐतिहासिक निर्णयावेळी राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यावेळी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे.