Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दैनिक ‘प्रवरातीर’ परिवारावर शोककळा; ज्येष्ठ मार्गदर्शक अनिता ठाकूर यांचे निधन
श्रद्धांजली

दैनिक ‘प्रवरातीर’ परिवारावर शोककळा; ज्येष्ठ मार्गदर्शक अनिता ठाकूर यांचे निधन

अनिता ठाकूर यांच्या पार्थिवावर आज सोमवारी (२३ मार्च) दुपारी ३:०० वाजता संगमनेर येथील प्रवरामाई अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर | प्रतिनिधी
दैनिक ‘प्रवरातीर’ परिवारातील मुख्य आधारस्तंभ आणि संस्थापक संपादक शिवपालसिंह ठाकूर यांच्या पत्नी व संपादक धीरज ठाकूर यांच्या मातोश्री अनिता शिवपालसिंह ठाकूर (वय ५५) यांचे आज सोमवारी (२३ मार्च) पहाटे चार वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संगमनेर शहरासह माध्यम क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिता ठाकूर या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने ठाकूर परिवाराचा मुख्य आधार हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
श्रीमती अनिता ठाकूर या अत्यंत मनमिळावू, प्रेमळ आणि सात्विक स्वभावाच्या होत्या. ‘प्रवरातीर’च्या जडणघडणीत आणि कौटुंबिक प्रवासात त्यांनी शिवपालसिंह ठाकूर यांना मोलाची साथ दिली. ठाकूर कुटुंबातील त्या एक प्रेमळ माऊली आणि मार्गदर्शक म्हणून सर्वांना परिचित होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच संगमनेर परिसरातील राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.
आज दुपारी अंत्यसंस्कार – अनिता ठाकूर यांच्या पार्थिवावर आज सोमवारी (२३ मार्च) दुपारी ३:०० वाजता संगमनेर येथील प्रवरामाई अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पती शिवपालसिंह ठाकूर, चिरंजीव तथा संपादक धीरज ठाकूर, सून, मुली, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.

🌟 दैनिक ‘प्रवरातीर’च्या माध्यमातून जनसेवा करणाऱ्या ठाकूर कुटुंबावर आलेला हा प्रसंग अत्यंत कठीण आहे. अनिता ठाकूर यांना ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’कडून भावपूर्ण श्रद्धांजली!

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 748
अनिता ठाकूर निधन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026

ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

08/10/2026

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पुरस्कार

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि गुजरात सरकारच्या संयुक्त विद्यमाने…

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.