Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘सर्वधर्म समभाव’ला ढोंग संबोधलं, लाल किल्ल्यावर तिरंगा ऐवजी भगवा ध्वज; भाषणात संभाजी भिडेंची वादग्रस्त विधाने
धार्मिक

‘सर्वधर्म समभाव’ला ढोंग संबोधलं, लाल किल्ल्यावर तिरंगा ऐवजी भगवा ध्वज; भाषणात संभाजी भिडेंची वादग्रस्त विधाने

भिडे यांनी देशाची एकात्मता भगव्या झेंड्यामध्ये असल्याचं म्हटलं.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

नाशिक: श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी नाशिकमध्ये केलेल्या एका जाहीर भाषणात अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्याचं प्रतीक असलेल्या तिरंग्याऐवजी लाल किल्ल्यावर भगवा ध्वज फडकवण्याचं आवाहन करतानाच सर्वधर्म समभावाला ‘ढोंगीपणा’ म्हणत ‘भारत मातेच्या भविष्याशी केलेली प्रतारणा’ असं संबोधलं.

नाशिक दौऱ्यावर असताना राणेनगरमध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने उभारलेल्या 51 फूट उंच हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. 

‘भारतीय स्वातंत्र्य आणि आपण व हिंदवी स्वराज्य सुवर्ण सिंहासन’ या विषयावर बोलताना भिडे म्हणाले, “आपण तिरंगा आणि संविधान मानले पाहिजे, पण भगवा ध्वज हे हजारो वर्षांपासून देशाचे प्रतीक आहे. 15 ऑगस्टला तिरंगा फडकवूच, पण दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्यासाठी आपण काम करत राहू.” त्यांनी ‘वसुधैव कुटुंबकम्’ हे तत्त्व स्वीकारून भगवा ध्वज लाल किल्ल्यावर फडकवण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहनही केलं.

आपण हिंदु राष्ट्रासाठी जगले पाहिजे आणि देव, देश, धर्मासाठी लढले पाहिजे, असं सांगत भिडे यांनी देशाची एकात्मता भगव्या झेंड्यामध्ये असल्याचं म्हटलं. 

या वेळी त्यांनी ‘आंबा खाल्ल्याने मुले होतात’ या त्यांच्या जुन्या विधानाचा पुनरुच्चार केला. त्यांनी प्रसारमाध्यमांवरही टीका केली आणि म्हणाले की या विधानामुळे त्यांच्यावर खटला सुरू आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याबद्दल बोलताना भिडे यांनी महाराजांनी संघर्ष करणारा समाज निर्माण केला, असं सांगितलं. तसेच, छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीचा भाऊ गणोजी शिर्के याला ‘नालायक माणूस’ म्हणत त्याने ‘वतनासाठी शेण खाल्लं’ असं वादग्रस्त वक्तव्यही केलं. याव्यतिरिक्त, त्यांनी खग्रास ग्रहणाच्या वेळी मंत्रजप केल्यास त्या मंत्राची शक्ती मिळते, असाही दावा केला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 373
वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय

30/09/2026

आश्वी पोलिसांच्या दडपशाहीने विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न; गणेश मंडळांचा संताप, चौकशीची मागणी

26/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

By Annant Ppangarkar10/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- भौगोलिकदृष्ट्या विस्ताराने मोठ्या असलेल्या संगमनेर तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांचे जाळे अधिक भक्कम…

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.