Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अखिल भारतीय ग्राहक पंचायत संगमनेरच्या अध्यक्षपदी विनायक वाडेकर, तर महिला अध्यक्षपदी प्रज्ञा शिंदे
यश / निवड / पुरस्कार

अखिल भारतीय ग्राहक पंचायत संगमनेरच्या अध्यक्षपदी विनायक वाडेकर, तर महिला अध्यक्षपदी प्रज्ञा शिंदे

नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांनी ग्राहक हक्कांची जाणीव वाढवण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/08/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर, प्रतिनिधी: अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या संगमनेर तालुका कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली. यामध्ये विनायक वाडेकर यांची तालुका अध्यक्षपदी, तर प्रज्ञा शिंदे यांची महिला अध्यक्षपदी निवड झाली आहे. जिल्हाध्यक्ष शाहूराव औटी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.

या बैठकीत जिल्हा उपाध्यक्ष सुरेश राहाणे, जिल्हा सचिव दिनेश थोरात, जिल्हा कोषाध्यक्ष अप्पासाहेब नरोटे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भगवान गायकवाड आणि जिल्हा ग्राहक मार्गदर्शन आयाम प्रमुख हरिभाऊ चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

नव्याने जाहीर करण्यात आलेली कार्यकारिणी अशी, विनायक वाडेकर (अध्यक्ष), प्रज्ञा शिंदे (महिला अध्यक्ष), रोशन कोथमिरे, प्रदीप रहाणे (उपाध्यक्ष), प्रशांत राऊत (सचिव), सर्जेराव वाघ, माधव वाळे (सहसचिव), अशोक घोडे (कोषाध्यक्ष), सचिन गिरी (सहकोषाध्यक्ष)

या व्यतिरिक्त, विविध विभागांच्या आयाम प्रमुखांचीही निवड करण्यात आली. यामध्ये कृषी विभाग प्रमुख म्हणून सीताराम पानसरे, पर्यावरण विभाग प्रमुख म्हणून सौरभ म्हाळस, आणि महसूल विभाग प्रमुख म्हणून शाम नाईकवाडी यांची नियुक्ती करण्यात आली. राहुल पानसरे, सचिन आव्हाड आणि दादा शेटे हे कार्यकारिणी सदस्य म्हणून काम पाहतील.

नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांनी ग्राहक हक्कांची जाणीव वाढवण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, संघटनेचे कार्य अधिक जोमाने होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. जिल्हाध्यक्ष शाहूराव औटी यांनी या प्रसंगी नागरिकांना ग्राहक पंचायतीचे सदस्य होण्याचे आवाहन केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 644
अखिल भारतीय ग्राहक पंचायत पदाधिकारी निवडी प्रज्ञा शिंदे विनायक वाडेकर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

प्रवीण बागडे यांना ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

18/08/2026

संगमनेर तालुका व शहर काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर; अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे आणि अमोल शेलकर यांच्यावर मोठी जबाबदारी

18/07/2026

रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ च्या असिस्टंट गव्हर्नरपदी आनंद हासे

16/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

By Annant Ppangarkar21/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सोशल मीडिया हे आजच्या माहितीच्या युगात अत्यंत प्रभावी माध्यम बनले…

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.