Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ च्या असिस्टंट गव्हर्नरपदी आनंद हासे
यश / निवड / पुरस्कार

रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ च्या असिस्टंट गव्हर्नरपदी आनंद हासे

तिन्ही क्लबसोबत समन्वय साधून अधिक प्रभावी, शाश्वत आणि समाजोपयोगी प्रकल्प राबविण्यास प्राधान्य देणार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/07/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या रोटरी वर्ष २०२६–२७ साठी रो. आनंद किसन हासे यांची असिस्टंट गव्हर्नर म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्यावर रोटरी क्लब ऑफ शिर्डी साईबाबा, रोटरी क्लब ऑफ कोपरगाव सेंट्रल आणि रोटरी क्लब ऑफ अकोले सेंट्रल या तीन क्लबच्या मार्गदर्शन व समन्वयाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
रोटरी जिल्हा ३१३२ चे प्रांतपाल रो. जयेशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली आनंद हासे हे या तीनही क्लबचे नेतृत्व विकास, वार्षिक नियोजन, सदस्यवाढ, द रोटरी फाउंडेशन, प्रभावी सेवा प्रकल्प तसेच जिल्ह्याच्या उद्दिष्टांशी सुसंगत कार्य करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत.
हासे हे रोटरी क्लब ऑफ संगमनेरचे माजी अध्यक्ष असून त्यांच्या अध्यक्षीय कार्यकाळात त्यांनी ‘फुलझडी’, कोविड काळात पती गमाविलेल्या एकल महिलांना पीठ गिरणी वितरण, शिलाई मशीन वितरण यांसारखे नाविन्यपूर्ण, स्वयंपूर्ण आणि समाजाभिमुख प्रकल्प यशस्वीरीत्या राबविले. त्यांच्या नेतृत्वाखाली क्लबने आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक विकासाच्या क्षेत्रात अनेक उल्लेखनीय उपक्रम राबवून समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
व्यावसायिकदृष्ट्या हासे हे युवा पॉलीप्रिंट अँड पॅकेजिंग इंडस्ट्रीज तसेच दैनिक युवावार्ताचे संचालक आहेत. याशिवाय ते रोटरी आय केअर ट्रस्टचे विश्वस्त, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे संचालक तसेच श्रीसंगम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे संचालक म्हणूनही कार्यरत आहेत. उद्योग, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावी नेतृत्व यांचा समतोल साधत त्यांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे.
आपल्या निवडीबद्दल हासे म्हणाले, “असिस्टंट गव्हर्नर म्हणून मिळालेली ही जबाबदारी माझ्यासाठी मोठा सन्मान असून त्याचबरोबर ती एक महत्त्वाची जबाबदारीही आहे. प्रांतपाल रो. जयेशभाई पटेल यांच्या संकल्पनेनुसार तिन्ही क्लबसोबत समन्वय साधून अधिक प्रभावी, शाश्वत आणि समाजोपयोगी प्रकल्प राबविण्यास प्राधान्य देणार आहे.”

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 461
आनंद हासे निवड रोटरी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

इरफानभाई मन्सुरी यांची भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या अहिल्यानगर उत्तर जिल्हा सचिवपदी नियुक्ती

25/09/2026

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

संगमनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी साई दिघे, तर उपाध्यक्षपदी निलेश शिंदे यांची एकमताने निवड

20/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.