Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दुःखद! फर्निचर दुकानाला आग, एकाच कुटुंबातील ५ जणांचा गुदमरून मृत्यू
श्रद्धांजली

दुःखद! फर्निचर दुकानाला आग, एकाच कुटुंबातील ५ जणांचा गुदमरून मृत्यू

मृतांमध्ये मयूर अरुण रासने (वय ३६), त्यांची पत्नी पायल (वय ३०), मुले अंश (वय ११) आणि चैतन्य (वय ६) आणि आजी सिंधुताई चंद्रकांत रासने (वय ८५) यांचा समावेश आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
fire isolated over black background
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

नेवासा फाटा येथील एका फर्निचर दुकानाला भीषण आग लागल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

नेवासा फाटा परिसरातील ‘कालिका फर्निचर’ या दुकानाला रविवारी रात्री उशिरा आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, दुकानाच्या मागील बाजूला राहत असलेल्या कुटुंबाला बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. आगीमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे गुदमरून त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये मयूर अरुण रासने (वय ३६), त्यांची पत्नी पायल (वय ३०), मुले अंश (वय ११) आणि चैतन्य (वय ६) आणि आजी सिंधुताई चंद्रकांत रासने (वय ८५) यांचा समावेश आहे. सुदैवाने, मयूर यांचे आई-वडील बाहेरगावी गेल्याने ते बचावले आहेत.

आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा पोलिसांचा संशय आहे. दुकानात मोठ्या प्रमाणात लाकडी फर्निचर, गाद्या आणि इतर ज्वलनशील पदार्थ असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले.

स्थानिकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले आणि अग्निशमन दलालाही पाचारण केले. पण आगीची तीव्रता इतकी जास्त होती की, आत अडकलेल्या कुटुंबाला बाहेर काढणे शक्य झाले नाही. या दुर्दैवी घटनेनंतर व्यावसायिक ठिकाणी अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी प्रशासनाकडे दुकानांमध्ये अग्निशमन यंत्रणा अनिवार्य करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून अशा दुर्घटना पुन्हा घडणार नाहीत.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. आगीच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,176
आग होळपळून मृत्यू
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026

ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

08/10/2026

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

By Annant Ppangarkar11/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यात विविध ठिकाणांहून देवीच्या पायी ज्योती आणण्याची धार्मिक…

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.