Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘कीर्तनकाराची बाळासाहेब थोरातांना धमकी’, धमकी ही केवळ राजकीय टीका नसून ती संगमनेरच्या सामाजिक घडीला बदनाम करणारी – आमदार सत्यजित तांबे
गुन्हेगारी

‘कीर्तनकाराची बाळासाहेब थोरातांना धमकी’, धमकी ही केवळ राजकीय टीका नसून ती संगमनेरच्या सामाजिक घडीला बदनाम करणारी – आमदार सत्यजित तांबे

अशाच एका घटनेत, एका उद्योगपतीने शहराच्या विद्रुपीकरणावर आक्षेप घेतला म्हणून त्यालाही अत्यंत वाईट भाषेत टीकेला सामोरे जावे लागले होते.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर, प्रतिनिधी: ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना तथाकथित कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या गंभीर घटनेनंतर संगमनेरचे आमदार सत्यजीत तांबे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तांबे यांनी समाज माध्यमांवर एक सविस्तर पोस्ट लिहून ही धमकी संगमनेरची सामाजिक घडी आणि शांतता बिघडवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. संगमनेरची स्वाभिमानी जनता असल्या विकृत मानसिकतेचा निषेध करते, असेही त्यांनी म्हटले आहे.

राजकीय टीका करताना विरोधकही जपून शब्द वापरतात- आपल्या पोस्टमध्ये सत्यजीत तांबे म्हणतात, ‘संत-महात्म्यांच्या परंपरेने समृद्ध असलेल्या महाराष्ट्रात, बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या नेत्यावर टीका करताना विरोधकही जपून शब्द वापरतात. पण स्वतःला कीर्तनकार म्हणवणाऱ्या एका उद्धट व्यक्तीने त्यांच्याविषयी जे काही बोलले, ते महाराष्ट्रातील कोणत्याही वारकरी संप्रदायातील कीर्तनकाराला आवडलेले नाही. ‘

या घटनेमुळे संगमनेरचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही तांबे यांनी केला. त्यांनी म्हटले की, गेल्या काही काळात संगमनेरचे नाव बदनाम करण्यासाठी काही घटना सातत्याने घडवून आणल्या जात आहेत. या घटना केवळ राजकीय नाहीत किंवा त्या फक्त थोरात साहेबांशी संबंधित नाहीत. अशाच एका घटनेत, एका उद्योगपतीने शहराच्या विद्रुपीकरणावर आक्षेप घेतला म्हणून त्यालाही अत्यंत वाईट भाषेत टीकेला सामोरे जावे लागले होते.

https://x.com/satyajeettambe/status/1957638578273476997?t=QPS8FMTnx0TNm6z1PVC2bA&s=19

एक काळचा दुष्काळी तालुका आज सुजलाम-सुफलाम- संगमनेरच्या प्रगतीचा उल्लेख करताना तांबे यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यांनी म्हटले की, आज संगमनेरच्या सहकारी बँकांमधील ठेवी ७,००० कोटींच्या घरात आहेत. येथे दररोज ९ लाख लिटर दूध आणि ७ लाख अंडी तयार होतात. संगमनेरचा साखर कारखाना उत्कृष्ट सहकारी साखर कारखाना म्हणून ओळखला जातो. संगमनेरमध्ये ५ वैद्यकीय महाविद्यालये आहेत, त्यापैकी ४ महाविद्यालये थोरातांच्या विरोधकांची आहेत. यावरूनच येथे द्वेषाचे राजकारण चालत नाही, हे स्पष्ट होते.

एकेकाळी पर्जन्यछायेतील व दुष्काळी असलेला संगमनेर तालुका आज स्वातंत्र्यसेनानी स्व. भाऊसाहेब थोरात आणि बाळासाहेब थोरात यांच्या योगदानाने सुजलाम-सुफलाम झाला आहे. प्रवरा नदीला पाणी नसताना संगमनेर शहराला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत होती, पण आता निळवंडे धरणातून २४ तास स्वच्छ पाणी मिळते, ही याच योगदानाची साक्ष आहे.

संगमनेरची जनता हे कधीही सहन करणार नाही- बाळासाहेब थोरातांना मिळालेली धमकी ही केवळ राजकीय टीका नसून ती संगमनेरच्या सामाजिक घडीला बदनाम करणारी आहे, असे तांबे यांनी ठामपणे सांगितले. अशा प्रकारच्या विकृत हल्ल्यांचा संगमनेरची स्वाभिमानी जनता कधीही स्वीकार करणार नाही आणि ते योग्य वेळी अशा वृत्तीला धडा शिकवतील, असा इशाराही त्यांनी शेवटी दिला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,332
ट्विटर धमकी बाळासाहेब थोरात सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- वैद्यकीय क्षेत्र हे केवळ व्यवसाय नसून समाजसेवेचे एक अत्यंत प्रभावी माध्यम…

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.