Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिक्षण विभागाचा बोगस कारभार खपवून घेणार नाही; आमदार सत्यजीत तांबे यांचा २५ मे पासून आंदोलनाचा इशारा
आंदोलन

शिक्षण विभागाचा बोगस कारभार खपवून घेणार नाही; आमदार सत्यजीत तांबे यांचा २५ मे पासून आंदोलनाचा इशारा

तर २५ मे पासून सुरू होणारे हे बेमुदत धरणे आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत मागे घेतले जाणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: 

राज्यातील शालेय शिक्षण विभागात सध्या सुरू असलेला प्रशासकीय गोंधळ आणि उत्तर महाराष्ट्रातील विस्कळीत झालेली शिक्षण व्यवस्था यावरून नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभाराचा पाढा वाचत त्यांनी थेट राज्याच्या शिक्षण आयुक्तांना पत्र धाडले असून, प्रलंबित प्रश्नांवर तात्काळ तोडगा न निघाल्यास २५ मे २०२६ पासून पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

आमदार तांबे यांनी पत्रात नमूद केल्यानुसार, नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या पाचही जिल्ह्यांमध्ये शिक्षण क्षेत्राची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. प्रशासकीय दिरंगाईमुळे शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि संस्थाचालक यांच्यात अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून संपूर्ण यंत्रणाच दिशाहीन झाली असल्याचे चित्र आहे. 

विशेषतः एसीआयटी चौकशीच्या नावाखाली अत्यंत साधी आणि दैनंदिन स्वरूपाची कामेही प्रलंबित ठेवली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. प्रशासनाकडून केवळ तात्पुरत्या मलमपट्टीचे काम केले जात असून ठोस उपाययोजनांचा अभाव असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शिक्षण विभागातील अनेक समस्या या आर्थिक स्वरूपाच्या नसून केवळ प्रशासकीय नियोजनाशी संबंधित आहेत, असे असतानाही वारंवार अर्थसंकल्पाचे कारण पुढे करून कामे टाळली जात असल्याबद्दल आमदार तांबे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सध्या शिक्षकांवर जनगणना, मतदार नोंदणी आणि बीएलओ सारख्या अशैक्षणिक कामांचा मोठा भार टाकला जात आहे. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर आणि अध्यापनावर होत आहे. शाळांमध्ये आता शिक्षणापेक्षा केवळ अहवाल सादर करणे, लेखापरीक्षण आणि इतर पूरक कागदोपत्री कामांनाच अधिक महत्त्व दिले जात असून ही बाब शैक्षणिक भवितव्यासाठी चिंताजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर, आमदार तांबे यांनी मुख्य शिक्षण आयुक्तांकडे उत्तर महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेचा सखोल आढावा घेण्यासाठी तातडीची बैठक घेण्याची मागणी केली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुणे येथे ही संयुक्त बैठक आयोजित करून त्यात उत्तर महाराष्ट्रातील शिक्षण अधिकारी, उपसंचालक, शिक्षक संघटना, संस्थाचालक, विद्यार्थी आणि पालकांचे प्रतिनिधी यांना निमंत्रित करावे, अशी त्यांची मागणी आहे. या बैठकीत चर्चा करून सर्व प्रलंबित प्रश्नांवर दीर्घकालीन आणि ठोस निर्णय होणे अपेक्षित आहे.

आंदोलनाचा इशारा देताना आमदार तांबे यांनी स्पष्ट केले की, वयाच्या १८ व्या वर्षापासून ते विविध सामाजिक आणि शैक्षणिक चळवळींमध्ये सक्रिय आहेत. जुनी पेन्शन योजना असो किंवा विनाअनुदानित शाळांचा अनुदानाचा प्रश्न, त्यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. जर शिक्षण विभागाने त्यांच्या मागण्यांची दखल घेतली नाही आणि प्रश्नांची तड लावली नाही, तर २५ मे पासून सुरू होणारे हे बेमुदत धरणे आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत मागे घेतले जाणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 444
आंदोलन शिक्षण विभाग सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
नैसर्गिक आपत्ती

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सध्या दुष्काळाची अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली असून…

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.