Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर पालिकेच्या कारवाई विरोधात शिंदे शिवसेना आक्रमक; भाजीची पाटीच मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात नेत नगरसेविका साक्षी सूर्यवंशींचे ‘गांधीगिरी’ आंदोलन
आंदोलन

संगमनेर पालिकेच्या कारवाई विरोधात शिंदे शिवसेना आक्रमक; भाजीची पाटीच मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात नेत नगरसेविका साक्षी सूर्यवंशींचे ‘गांधीगिरी’ आंदोलन

यापूर्वी पालिकेने शहरात केलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाया कितपत यशस्वी झाल्या, याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/06/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

शहरातील ऐतिहासिक सर डि.एम. पेटीट हायस्कूल परिसरातील कष्टकरी भाजी विक्रेत्यांवर संगमनेर नगर परिषदेने अचानक केलेल्या या एकतर्फी आणि अन्यायकारक भूमिकेविरोधात संगमनेर नगर परिषदेतील एकमेव विरोधी शिंदे गटाच्या शिवसेना नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांनी थेट रस्त्यावर उतरत अनोखे आंदोलन केले. सर्व भाजी विक्रेत्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत त्यांनी स्वतः सोबत भाजीपाल्याची पाटी घेतली आणि मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात गेल्या. यावेळी नगरपालिकेच्या प्रशासनाविरोधात जोरदार निषेध घोषणा दिल्या. या गांधीगिरी आंदोलनाने लक्ष वेधून घेतले असून, जोपर्यंत प्रशासनासोबत सकारात्मक तोडगा निघत नाही, तोपर्यंत पालिकेने पुढील कोणतीही कारवाई थांबवावी, अशी आक्रमक मागणी यावेळी करण्यात आली.

या संदर्भात नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांनी संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना एक सविस्तर व जाब विचारणारे निवेदन सादर केले आहे. १ जून २०२६ रोजी पेटीट हायस्कूल शेजारी आपल्या दैनंदिन उदरनिर्वाहासाठी बसणाऱ्या गरीब आणि कष्टकरी भाजी विक्रेत्यांवर पालिकेने जी दंडेलशाही केली, त्याबाबत नागरिकांमध्ये आणि विक्रेत्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

प्रशासनाने या भाजी विक्रेत्यांसाठी मेडिकव्हर हॉस्पिटलसमोर पर्यायी व्यवस्था केल्याचा दावा केला असला, तरी ही जागा अत्यंत गैरसोयीची आणि आरोग्यास घातक असल्याचे समोर आले आहे. नियोजित जागेवर उघड्या गटारीची दुर्गंधी पसरली असून, शेजारीच रुग्णालय असल्याने रुग्णवाहिकांच्या सततच्या ये-जा मुळे अपघात आणि वाहतूक कोंडीचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच या ठिकाणी सुलभ शौचालय आणि पार्किंगची कोणतीही पुरेशी सुविधा पालिकेने उपलब्ध करून दिलेली नाही.

विशेष म्हणजे भाजी व्यवसायात मोठ्या प्रमाणावर महिलांचा सहभाग असतो, मात्र पालिकेने सुचवलेल्या नव्या जागेत महिलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असणारे सीसीटीव्ही कॅमेरे आणि हायमॅक्स दिव्यांची कोणतीही सोय केलेली नाही. याशिवाय, प्रशासनाने प्रस्तावित केलेली जागा अत्यंत अपुरी असून, भाजीपाल्याचे कॅरेट आणि टोपल्या ठेवण्यासाठी किमान आवश्यक असलेली जागाही तेथे उपलब्ध नाही.

संपूर्ण जागेचे ‘पी.सी.सी.’ (सिमेंट कॉंक्रिटीकरण) केलेले नसल्यामुळे, ऐन पावसाळ्यात या भागात पाणी साचून मोठ्या प्रमाणावर चिखल होईल आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आधी त्या ठिकाणच्या नाल्याची दुर्गंधी बंदिस्त करून तातडीने उपाययोजना कराव्यात आणि त्यानंतरच स्थलांतराचा विचार व्हावा, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

कष्टकऱ्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न उपस्थित करताना नगरसेविका सूर्यवंशी यांनी प्रशासनाला थेट सवाल केले आहेत. पालिकेचे नियम जर असतील तर ते शहरातील सर्वांसाठी समान असायला हवेत, केवळ गोरगरिबांवरच हा अन्याय का? पालिकेने काल केलेली कारवाई खरोखरच नियमानुसार झाली का, सर्वांना समान न्याय मिळाला का, आणि हातावर पोट असणाऱ्या या छोट्या विक्रेत्यांच्या उपजीविकेचा प्रशासनाने संवेदनशीलतेने विचार केला आहे का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

यापूर्वी पालिकेने शहरात केलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाया कितपत यशस्वी झाल्या, याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. जोपर्यंत मुख्याधिकारी स्वतः सर्व भाजी विक्रेत्यांना चर्चेसाठी बोलावत नाहीत आणि सर्वांचे समाधान होऊन योग्य मार्ग निघत नाही, तोपर्यंत भाजी विक्रेत्यांना आहे त्याच ठिकाणी बसू द्यावे व कोणतीही एकतर्फी कारवाई करू नये, अशी ठाम भूमिका या आंदोलनाद्वारे घेण्यात आली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,376
अतिक्रमण कारवाई आंदोलन दयानंद गोरे निवेदन भाजीपाला विक्रेते संगमनेर नगर परिषद साक्षी सूर्यवंशी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.