Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

July 15, 2026

आज, बुधवार १५ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 15, 2026

राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या

July 14, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा
शेती व सहकार

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

यापूर्वी जेव्हा जेव्हा खतांचा तुटवडा जाणवला, तेव्हा लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी तातडीने शासनाच्या विविध विभागांशी समन्वय साधून बफर स्टॉक खुला केला होता
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJuly 15, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर :
सध्या खरीप हंगामाने वेग घेतला असून तालुक्यातील शेतकऱ्यांना बाजरी, मका, सोयाबीन यांसारख्या पिकांसाठी युरिया खताची अत्यंत आवश्यकता आहे. मात्र, बाजारात युरियाचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर, शासनाच्या ताब्यातील युरियाचा बफर स्टॉक तातडीने शेतकऱ्यांसाठी खुला करावा, अशी आग्रही मागणी संगमनेर तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना एका शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले.
यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अजय फटांगरे, सहकार महर्षी थोरात कारखान्याचे संचालक विजय राहणे, सचिन दिघे, सरपंच नवनाथ कातोरे, संदीप गुंजाळ, अमोल गुंजाळ, शुभम गुंजाळ, योगेश गव्हाणे, अरुण गुंजाळ, सागर वामन, नामदेव शिंदे, सुनील लांडगे, बाबासाहेब आभाळे, सचिन गुंजाळ, नानासाहेब ढगे, भाऊसाहेब बालवडे, लक्ष्मण गुंजाळ, अनिल लांडगे, सुदर्शन गुंजाळ, संगम लांडगे आणि सचिन लांडगे यांच्यासह तालुक्यातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशासनाला दिलेल्या निवेदनात काँग्रेसने नमूद केले आहे की, तालुक्यातील खतांचा तुटवडा हा कृत्रिम नसून प्रत्यक्षात विक्रेत्यांकडे युरियाचा साठाच उपलब्ध नाही. असे असतानाही, तालुक्यात युरिया मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याची चुकीची माहिती देऊन प्रशासनाकडून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. या चुकीच्या माहितीमुळे भविष्यात कृषी विभागाविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे. खरीप हंगामातील पिके वाचवण्यासाठी व शेतकऱ्यांचे होणारे मोठे नुकसान टाळण्यासाठी शासनाने राखीव ठेवलेला बफर स्टॉक त्वरित बाजारात आणणे गरजेचे आहे.
तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांनी सत्ताधाऱ्यांवर व प्रशासनावर निशाणा साधला. ते म्हणाले की, यापूर्वी जेव्हा जेव्हा खतांचा तुटवडा जाणवला, तेव्हा लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी तातडीने शासनाच्या विविध विभागांशी समन्वय साधून बफर स्टॉक खुला केला होता आणि शेतकऱ्यांना वेळेत खत मिळवून दिले होते. मात्र, सध्याचे प्रशासन आपले अपयश लपवण्यासाठी केवळ चुकीच्या बातम्या पसरवत आहे.
तर काँग्रेसचे नेते सचिन दिघे यांनी इशारा दिला की, संगमनेर हा कष्टकरी आणि शेतकऱ्यांचा तालुका आहे. त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत न पाहता तातडीने युरियाचा बफर स्टॉक खुला करावा, अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी तीव्र आंदोलन छेडले जाईल. निवेदन सादर करताना विजय राहणे, नवनाथ कातोरे, संदीप गुंजाळ, योगेश गव्हाणे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनीही शेतकऱ्यांच्या विविध समस्या मांडल्या. काँग्रेसच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता प्रशासनाकडून शेतकऱ्यांना लवकरच युरिया उपलब्ध करून दिला जाईल, अशी आशा तालुक्यातील बळीराजाला लागली आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 103
अजय फटांगरे कृषी निवेदन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना: ३१ जुलैपर्यंत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

July 13, 2026

आधीच मुसळधार, त्यात दूषित पाण्याचा धोका! संगमनेर पालिकेच्या ढिसाळ कारभारावर विरोधी नगरसेविका साक्षी सूर्यवंशी कडाडल्या… मुख्याधिकाऱ्यांकडे केल्या ‘या’ मागण्या

July 9, 2026

अयोध्येतील राम मंदिर दान चोरी प्रकरणी ‘झिरो एफआयआर’ नोंदवण्यासाठी पोलीस निरीक्षकांना निवेदन

July 6, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

By अनंत पांगारकरJuly 15, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : सध्या खरीप हंगामाने वेग घेतला असून तालुक्यातील शेतकऱ्यांना बाजरी,…

आज, बुधवार १५ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 15, 2026

राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या

July 14, 2026

‘टॉपटेन इम्पेरिअल’ इमारतीत प्रस्तावित वाईन शॉपच्या स्थलांतराला स्थानिक व्यावसायिकांचा तीव्र विरोध; आमदार अमोल खताळ यांना निवेदन

July 14, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.