Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा घारगाव पोलिसांनी उधळला डाव; चौघे गजाआड, डिझेल चोरीचे दोन गुन्हे उघड
गुन्हेगारी

दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा घारगाव पोलिसांनी उधळला डाव; चौघे गजाआड, डिझेल चोरीचे दोन गुन्हे उघड

पकडलेल्या आरोपींना पोलीस कोठडीत घेऊन सखोल चौकशी केली असता, त्यांनी घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत उभ्या ट्रकमधून डिझेल चोरी केल्याचे दोन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

पुणे-नाशिक महामार्गावरील डोळासणे शिवारात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका सराईत टोळीला घारगाव पोलिसांनी पकडले. पोलिसांनी या कारवाईत चार आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून कारसह दरोड्याचे साहित्य आणि मोबाईल असा एकूण ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, पोलीस कोठडीत असताना केलेल्या चौकशीत या आरोपींनी घारगाव हद्दीत ट्रकमधून डिझेल चोरी केल्याचे दोन गुन्हे कबूल केले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. १४ एप्रिल रोजी पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास पोलीस ठाण्याचे पोलीस पथक पुणे-नाशिक हायवेवर रात्रगस्त घालत होते. यावेळी डोळासणे गावच्या बोगद्याजवळ अंधारात एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार संशयास्पदरित्या उभी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पथकाने तात्काळ कारला वेढा घातला.

पोलिसांची चाहूल लागताच कारमधील पाच जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून चौघांना जागीच पकडले, तर रितेश वसंत सदाफळ (रा. गणेश नगर, ता. राहाता) हा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. पकडलेल्या आरोपींनी सुरुवातीला नावे सांगण्यास टाळाटाळ केली, मात्र पोलिसांनी हिसका दाखवताच त्यांनी आपली नावे जीवन दत्तात्रय कांदे (वय १८, रा. श्रीरामपूर), तन्मय जितेंद्र कापसे (वय १७, रा. वाकडी, ता. श्रीरामपूर), आशिष अनिल पवार (वय १८, रा. येवला, हल्ली नेवासा फाटा) आणि दानिश सत्तार शेख (वय १९, रा. श्रीरामपूर, हल्ली संगमनेर) अशी सांगितली.

आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडे स्क्रू ड्रायव्हर, मिरची पूड, ५ मीटर लांब दोरी, लोखंडी गज आणि मोबाईल फोन आढळून आले. तसेच त्यांच्याकडील स्विफ्ट डिझायर कारची (MH 14 CS 9551) तपासणी केली असता, त्यात ३५ लिटरचा डिझेलने भरलेला ड्रम, दोन रिकामे ड्रम, लोखंडी कत्ती आणि वेगवेगळ्या वाहनांच्या नंबर प्लेट्स मिळून आल्या. यावरून ही टोळी मोठा गुन्हा करण्याच्या उद्देशाने जमल्याचे निष्पन्न झाले.

पकडलेल्या आरोपींना पोलीस कोठडीत घेऊन सखोल चौकशी केली असता, त्यांनी घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत उभ्या ट्रकमधून डिझेल चोरी केल्याचे दोन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, दत्तू चौधरी, प्रमोद गाडेकर, सुभाष बोडखे, चांगदेव नेहे आणि दत्तात्रय आंधळे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा अधिक तपास घारगाव पोलीस करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 698
घारगाव पोलीस टोळी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – समग्र शिक्षा योजना सन २०२६-२७ अंतर्गत संगमनेर विधानसभा…

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.