Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

August 1, 2026

‘कडलग इन्व्हेस्टमेंट’च्या आर्थिक साक्षरता कार्यशाळेला गुंतवणूकदारांचा प्रतिसाद

August 1, 2026

शनिवार, १ ऑगस्ट २०२६ — आजचा तुमचा दिवस कसा असेल

August 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लॅब कर्मचाऱ्याला लूटणाऱ्या तिघांना अटक; चौथा आरोपी फरार
गुन्हेगारी

लॅब कर्मचाऱ्याला लूटणाऱ्या तिघांना अटक; चौथा आरोपी फरार

आरोपी सराईत गुन्हेगार आहेत की कुणाच्या सांगण्यावरून त्यांनी हे कृत्य केले, याचा पोलीस तपास करत आहेत.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरSeptember 9, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – 

सिन्नर-शिर्डी महामार्गावर मिरगाव फाट्याजवळ रात्रीच्या वेळी एका लॅब टेक्निशियनला मारहाण करून १५,००० रुपये लुटणाऱ्या तिघांना वावी पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. या घटनेतील चौथा आरोपी मात्र अद्याप फरार असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

मागील महिन्यात ही घटना घडली होती. वावी येथे लॅब टेक्निशियन म्हणून काम करणारे सुधाकर सोपान वक्ते (वय ३५) हे आपले काम संपवून रात्री ८ च्या सुमारास जेऊर कुंभारी (कोपरगाव) येथील आपल्या घरी परत जात असताना चोरट्यांनी त्यांना गाठले. यावेळी त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील १५,००० रुपये हिसकावून चोरट्यांनी शिर्डीच्या दिशेने पळ काढला होता.

या घटनेनंतर सुधाकर वक्ते यांनी तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली. वावी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या आठ दिवसांच्या आत संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश बाबुराव सोळके (२४), धीरज नंदकिशोर गुंडगळ (२४) आणि भारत भागवत बांगर (२४) या तिघांना नाशिक येथून वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून अटक करण्यात आली. हे सर्व आरोपी नाशिकमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून काम करतात.

सुरुवातीला आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय कोठावळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणातील चौथा आरोपी अमर राकेश वळवी (रा. नवापूर, जि. नंदुरबार) हा अद्याप फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींना सोमवारी (दि. ८) सिन्नर न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. हे आरोपी सराईत गुन्हेगार आहेत की कुणाच्या सांगण्यावरून त्यांनी हे कृत्य केले, याचा पोलीस तपास करत आहेत.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 489
क्राईम गुन्हेगारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात लपून-छपून उरकला बालविवाह; ५ जणांवर घारगाव पोलिसांत गुन्हा

July 30, 2026

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026

संघटित गुन्हेगारीविरोधात मोठे पाऊल; गोवंश तस्करीप्रकरणी ‘बीएनएस’ कलम १११ अन्वये दोघांवर पहिली मोठी कारवाई संगमनेरात

July 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

By अनंत पांगारकरAugust 1, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: दलित, शोषितांचा आपल्या साहित्यातून आवाज बुलंद करणारे आणि हक्कांसाठी लढा…

‘कडलग इन्व्हेस्टमेंट’च्या आर्थिक साक्षरता कार्यशाळेला गुंतवणूकदारांचा प्रतिसाद

August 1, 2026

शनिवार, १ ऑगस्ट २०२६ — आजचा तुमचा दिवस कसा असेल

August 1, 2026

नाशिक-पुणे रेल्वेसाठी ९ ऑगस्टला महामार्गावर चक्काजाम; आमदार सत्यजीत तांबे यांच्याकडून जनआंदोलनाची हाक

July 31, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.