Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आता राज्यात नो पीयूसी, नो फ्युएल धोरण लवकरच लागू होणार
राजकारण

आता राज्यात नो पीयूसी, नो फ्युएल धोरण लवकरच लागू होणार

यासोबतच, बनावट पीयूसी प्रमाणपत्रे देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही मंत्र्यांनी दिले आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/09/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई – विशेष प्रतिनिधी

पुढील पिढीला प्रदूषणमुक्त वातावरण देण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. राज्यातील सर्व पेट्रोल पंपांवर ‘नो पीयूसी, नो फ्युएल’ (नो प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र, नो पेट्रोल) हे धोरण लवकरच सक्तीने लागू केले जाईल.

या अनुषंगाने परिवहन आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत परिवहन मंत्री बोलत होते. या बैठकीला परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सह सचिव (परिवहन) राजेंद्र होळकर यांच्यासह वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत ठरलेल्या धोरणानुसार, पेट्रोल पंपांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने प्रत्येक वाहनाचा क्रमांक स्कॅन केला जाईल, जेणेकरून त्याच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची (PUC) वैधता तपासली जाईल. जर एखाद्या वाहनाकडे वैध पीयूसी प्रमाणपत्र नसेल, तर त्याला इंधन दिले जाणार नाही. ही गैरसोय टाळण्यासाठी, प्रत्येक पेट्रोल पंपावर लगेच पीयूसी प्रमाणपत्र काढण्याची सोय उपलब्ध केली जाणार आहे. यामुळे वाहनचालकांना वेळेवर प्रमाणपत्र मिळवणे शक्य होईल.

या नवीन नियमांतर्गत, प्रत्येक पीयूसी प्रमाणपत्राला एक विशिष्ट ओळख क्रमांक (UID) दिला जाईल. यामुळे प्रमाणपत्राची वैधता वेळोवेळी तपासता येईल. तसेच, भविष्यात वाहन विक्री करणाऱ्या शोरूम्स आणि दुरुस्ती करणाऱ्या गॅरेजेसमध्येही पीयूसी प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था केली जाईल. या उपाययोजनांमुळे रस्त्यावर धावणाऱ्या प्रत्येक वाहनाकडे वैध पीयूसी असेल आणि त्यामुळे प्रदूषण पातळी कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यासोबतच, बनावट पीयूसी प्रमाणपत्रे देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही मंत्र्यांनी दिले आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 524
नो पीयूसी नो फ्युएल प्रताप सरनाईक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

By Annant Ppangarkar21/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सोशल मीडिया हे आजच्या माहितीच्या युगात अत्यंत प्रभावी माध्यम बनले…

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.