Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी

सध्या मुलावर लोणी येथील रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/09/2025Updated:11/09/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर –

संगमनेरमध्ये बिबट्याचा वाढता उपद्रव पुन्हा एकदा समोर आला आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण होत असल्याचे दिसत आहे. संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथे बिबट्याने एका चार वर्षांच्या चिमुकल्यावर प्राणघातक हल्ला केला असून, त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली.

आई, आजी आणि मामासोबत शेतात गेलेल्या श्रीधर नावाच्या मुलावर बिबट्याने अचानक हल्ला केला. मात्र, आई आणि आजीने मोठ्या हिमतीने आरडाओरडा केल्याने बिबट्याने त्याला सोडून पळ काढला.

सध्या मुलावर लोणी येथील रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. या घटनेमुळे परिसरात बिबट्याची दहशत वाढली असून, नागरिकांनी वनविभागाकडे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

शेडगाव येथील सेवानिवृत्त ग्रामसेवक लहानु फड यांची सून भारती फड गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास प्रवरा नदीच्या किनारी असलेल्या शेतात जनावरांसाठी गवत कापायला गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या आई सिंधूबाई नागरे, भाऊ शुभम नागरे आणि चार वर्षांचा मुलगा श्रीधर होता. श्रीधर जवळच खेळत असताना झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला ऊसाच्या शेतात ओढत नेले.

मुलावर हल्ला झाल्याचे पाहून आई भारती आणि आजी सिंधूबाई यांनी मोठ्या हिमतीने आरडाओरडा करत बिबट्याच्या दिशेने धाव घेतली. त्यामुळे बिबट्याने घाबरून मुलाला जागेवर सोडून दिल आणि पळून गेला. मात्र, तोपर्यंत बिबट्याने केलेल्या हल्ल्यात श्रीधरच्या मानेला गंभीर दुखापत झाली होती. तातडीने मामा शुभमने त्याला उपचारासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

सध्या मुलावर उपचार सुरू असून, सामाजिक कार्यकर्ते राजू आंधळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याची प्रकृती सुधारत आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचे हल्ले वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने यावर त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,536
बिबट्या हल्ला
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

By Annant Ppangarkar11/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यात विविध ठिकाणांहून देवीच्या पायी ज्योती आणण्याची धार्मिक…

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.