Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कीर्तनकारांकडून अनेकदा राजकीय पक्षाचा प्रचार, ‘धर्मपीठांनी संतांना नेहमीच त्रास दिला’ – पत्रकार सचिन परब
धार्मिक

कीर्तनकारांकडून अनेकदा राजकीय पक्षाचा प्रचार, ‘धर्मपीठांनी संतांना नेहमीच त्रास दिला’ – पत्रकार सचिन परब

संगमनेर येथील राज्यस्तरीय वारकरी चिंतन परिषदेत परब बोलत होते
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/09/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर –

सध्या काही कीर्तनकार राजकीय पक्षांचे जाहीर प्रचारक म्हणून काम करत असले, तरी पूर्वीही राजकीय पक्षांचा छुपा प्रचार अनेकदा झालेला आहे, असं मत ‘रिंगण’ मासिकाचे संपादक सचिन परब यांनी व्यक्त केलं. 

सकल वारकरी समाजाच्या वतीने संगमनेर येथील विठ्ठल मंदिर ऑफ नामदेव शिंपी समाज येथे राज्यस्तरीय वारकरी चिंतन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परब बोलत होते. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे मठाधिपती भारत महाराज जाधव होते. तर ज्येष्ठ कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे, ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार राजाभाऊ चोपदार, विचारवंत आणि कीर्तनकार डॉ. बालाजी जाधव, भारत महाराज घोगरे गुरुजी, समाधान महाराज देशमुख आणि पत्रकार-कीर्तनकार शामसुंदर महाराज सोन्नर उपस्थित होते.

परब यांनी आपल्या बालपणीचा एक अनुभव सांगत वारकरी संप्रदायातील या चुकीच्या गोष्टीवर प्रकाश टाकला. सचिन परब मूळचे कोकणातील असून, लहानपणी ते त्यांच्या आजीसोबत अनेकदा पंढरपूरच्या वारीला गेले होते. असाच एकदा वारी दरम्यान ते देगलूरकर मठातील चातुर्मास प्रवचन ऐकण्यासाठी बसले होते. त्यावेळी लालकृष्ण अडवाणी यांची राम मंदिरासाठी काढलेली रथयात्रा सुरू होती.

त्या दिवशी ही रथयात्रा बिहारमध्ये पोहोचणार होती आणि बिहारचे तत्कालीन नेते लालू प्रसाद यादव यांनी ती रथयात्रा अडवली. ही बातमी मठात पोहोचल्यावर, देगलूरकर फडावर चालणाऱ्या प्रवचनात मोठा बदल झाला. समोर संत तुकाराम महाराजांची गाथा असूनही त्यावर एकही शब्द न बोलता तब्बल अडीच तास पूर्णपणे राजकीय भाष्य करण्यात आलं, अशी आठवण परब यांनी सांगितली.

त्या-त्या वेळच्या धर्मपीठांनी संतांना नेहमीच त्रास दिला आहे, असं ते म्हणाले. ज्ञानेश्वर महाराजांना वाळीत टाकलं गेलं, तर तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणी नदीत बुडवण्याचा प्रयत्न केला गेला. हे सर्व धर्मपीठांनीच केलं. त्यामुळे संत आणि धर्मपीठ यांच्यात नेहमीच संघर्ष राहिला आहे, असं परब यांनी स्पष्ट केलं.

महात्मा गांधी यांनी संत तुकाराम महाराजांच्या सोळा अभंगांचं भाषांतर केलं आहे. गांधीजींचा संत विचारांवर दृढ विश्वास होता आणि ते वारकऱ्यांना प्रिय असले पाहिजेत. मात्र, आज गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला जर कीर्तनकार प्रिय मानत असतील, तर ही केवळ कीर्तनकार किंवा वारकरी समाजासाठीच नाही, तर संपूर्ण समाजासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे, अशी खंतही सचिन परब यांनी व्यक्त केली.

राजाभाऊ आवसक, अविनाश पाटील, शरद कदम, दीपक देवरे, सरस्वती शिंदे, रजत आवसक, राजेंद्र शित्रे, आणि जयवंत भोंडवे आदींनी या परिषदेचे आयोजन केले होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 415
वारकरी चिंतन परिषद सचिन परब
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय

30/09/2026

आश्वी पोलिसांच्या दडपशाहीने विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न; गणेश मंडळांचा संताप, चौकशीची मागणी

26/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

By Annant Ppangarkar12/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसेस दाखल झाल्या असून, यामुळे…

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.