Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अण्णासाहेब शिंदे यांचे नातू, सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचे निधन; आज पुण्यात अंत्यसंस्कार
श्रद्धांजली

अण्णासाहेब शिंदे यांचे नातू, सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचे निधन; आज पुण्यात अंत्यसंस्कार

आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केले दुःख
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/09/2025Updated:16/09/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
नवी दिल्ली-
सर्वोच्च न्यायालयातील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचे सोमवारी रात्री दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते अवघे ४८ वर्षांचे होते. त्यांच्या अकाली निधनाने कायदेक्षेत्र आणि महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
माजी केंद्रीय कृषीमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे नातू असलेले सिद्धार्थ शिंदे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील रहिवासी होते, मात्र त्यांचे कुटुंब अनेक वर्षांपासून पुण्यामध्ये स्थायिक आहे. सोमवारी कामकाजासाठी ते सर्वोच्च न्यायालयात गेले असता अचानक त्यांना चक्कर आली. त्यानंतर तातडीने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
सिद्धार्थ शिंदे गेल्या अनेक वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात वकिली करत होते. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचे उत्तम आकलन, तसेच संविधानाचे सखोल ज्ञान असलेले विधिज्ञ म्हणून त्यांची ओळख होती. कायद्यातील गुंतागुंतीचे विषय सामान्य लोकांना सोप्या भाषेत समजावून सांगण्यात त्यांचा हातखंडा होता.
सिद्धार्थ शिंदे यांचे पार्थिव मंगळवारी (१६ सप्टेंबर २०२५) सकाळी नवी दिल्लीहून पुण्यातील त्यांच्या घरी आणले जाणार आहे. त्यानंतर दुपारी १ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी, रविवार पेठ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात त्यांचे कुटुंबीय आहेत. त्यांच्या अकाली निधनाने शिंदे, जगदाळे आणि जगताप या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
राजकारणी, सहकारी आणि कुटुंबियांनी त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील सिध्दार्थ शिंदे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद व धक्कादायक आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा थोर कृषीतज्ञ अण्णासाहेब शिंदे यांचे सिद्धार्थ शिंदे हे नातू होते. संविधानाविषयीचे सखोल ज्ञान, तसेच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवरील बारकाईची दृष्टि यामुळे त्यांनी न्यायालयीन क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. गेल्या अनेक दशकांपासून ते सर्वोच्च न्यायालयात वकिली करत न्यायप्रक्रियेला दिशा देत होते. कायद्याची गुंतागुंत सामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत स्पष्ट करण्याची त्यांची खासियत होती. त्यांच्या निधनाने न्यायव्यवस्था आणि महाराष्ट्राने या एक जाणकार, अभ्यासू व समर्पित व्यक्तिमत्त्व कायमचे गमावले आहे.
आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या मामाच्या मुलाच्या निधनाबद्दल बोलताना, माझा मामेभाऊ व सुप्रीम कोर्टातील यशस्वी, अभ्यासू विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे यांच्या निधनाच्या बातमीने मी सुन्न झालो आहे. सिद्धार्थ दादा माझ्यासाठी फक्त भाऊ नव्हता, तर तो एक जिवलग मित्रही होता. पहिली दिल्ली वारी मला त्यानेच २५ वर्षांपूर्वी करून दिली होती. आयुष्यातील पहिला परदेश प्रवास, सिंगापूरला, तो तेथे शिक्षण घेत असताना त्यानेच मला सोबत नेले होते. तो अत्यंत हुशार, अभ्यासू आणि प्रेमळ माणूस होता. त्यांचे आजोबा, डॉ. आण्णासाहेब शिंदे हे देशाचे १६ वर्षे कृषी व अन्नमंत्री होते. देशातील हरितक्रांती तसेच धवलक्रांती (दुग्धव्यवसाय) घडवून आणण्याचे श्रेय त्यांना जाते. सिद्धार्थ दादाच्या अचानक जाण्याने आमच्या कुटुंबावर, शिंदे परिवारावर, त्याचे मामा दौंडच्या जगदाळे परीवारावर, त्याची बहीण दिलेल्या आर्वी (वर्धा) येथील खा. अमर काळे परीवारावर तसेच त्यांची सासुरवाडी सासवडच्या जगताप परिवारावर, जगभर पसरलेल्या सिध्दार्थदादाच्या मित्र परीवारावर मोठ्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सिद्धार्थ शिंदे यांच्या निधनाने न्यायव्यवस्था आणि महाराष्ट्राने एक जाणकार, अभ्यासू आणि समर्पित व्यक्तिमत्त्व गमावले आहे. सिद्धार्थ दादा माझ्यासाठी फक्त भाऊ नव्हता, तर एक जिवलग मित्रही होता. तो अत्यंत हुशार, अभ्यासू आणि प्रेमळ माणूस होता.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,084
निधन श्रद्धांजली सिद्धार्थ शिंदे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026

ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

08/10/2026

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

By Annant Ppangarkar11/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यात विविध ठिकाणांहून देवीच्या पायी ज्योती आणण्याची धार्मिक…

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.