Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शुक्रवार, २८ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

28/08/2026

अवैध मावा बनविणाऱ्या दोन कारखान्यांवर धाड; ४.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त, ५ जणांवर गुन्हे दाखल

27/08/2026

अश्विनाथ गड हे सामाजिक एकतेचे प्रतीक : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

27/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निळवंडेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला धोका निर्माण करणाऱ्या 33 केव्ही वीज वाहिनीला चिखली ग्रामस्थांचा तीव्र विरोध, ग्रामपंचायतने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत दिला आंदोलनाचा इशारा; श्रमिक मिल्क अँड फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री’प्रश्नी मुख्यमंत्री लक्ष घालणार का?
महाराष्ट्र संवाद विशेष

निळवंडेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला धोका निर्माण करणाऱ्या 33 केव्ही वीज वाहिनीला चिखली ग्रामस्थांचा तीव्र विरोध, ग्रामपंचायतने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत दिला आंदोलनाचा इशारा; श्रमिक मिल्क अँड फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री’प्रश्नी मुख्यमंत्री लक्ष घालणार का?

दरम्यान एका उद्योगपतीसाठी अनेकांचा मोठा विरोध झूगारून सुरू असलेल्या या कामाविरोधात राज्याचे कार्यतत्पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/09/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – 

संगमनेर तालुक्यातील चिखली गावाच्या ग्रामपंचायतीने निळवंडे धरणातून संगमनेर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईप लाईनवरून दडपशाहीने टाकण्यात येत असलेल्या 33 केव्ही उच्चदाब ओव्हरहेड वीज वाहिनीला तीव्र विरोध दर्शवला आहे. ग्रामस्थांनी ग्रामसभेत या संदर्भात केलेल्या ठरावानंतर ग्रामपंचायतीने थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून ही वीज वाहिनी तातडीने हटवण्याची मागणी केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

‘श्रमिक मिल्क अँड फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री’ या कंपनीने 7 मे 2024 रोजी चिखली सबस्टेशन ते वाडापूर आणि मेमाणे वस्तीपर्यंत वीज वाहिनी टाकण्यासाठी ग्रामपंचायतीकडे NOC (ना हरकत प्रमाणपत्र) मागितले होते. मात्र, 30 मे 2024 रोजी झालेल्या मासिक सभेत, ग्रामपंचायतीने ‘चिखली सबस्टेशन ते वाडापूर ते संगमनेर-अकोले रोड’ अशी चुकीची NOC दिली. ही चूक लक्षात आल्यावर, 28 मे 2025 रोजीच्या ग्रामसभेत ठराव क्र. 8(3) आणि 8(4) नुसार ही NOC रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात ग्रामस्थांनी संबंधित कंपनी आणि ठेकेदारांनी ग्रामपंचायतीने चुकीने दिलेली NOC (ना हरकत प्रमाणपत्र) रद्द झालेली असतानाही हे काम बेकायदेशीरपणे सुरू ठेवले आहे. पोलिसांनी केलेल्या दडपशाहीमुळे हे काम चुकीच्या मार्गाने केले जात असल्याचा आरोप त्यांनी या पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे केला आहे.

या वीज वाहिनीमुळे निर्माण होणाऱ्या गंभीर परिणामांची कल्पना या पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली आहे. चिखली गावाजवळून जाणारी ही 33 केव्ही वीज वाहिनी निळवंडे धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनवरून टाकण्यात येत आहे. ग्रामस्थांनी पत्रात म्हटले आहे की, जर कोणत्याही कारणाने ही वीज वाहिनी तुटून पाईपलाईनवर पडली, तर मोठा अपघात होऊ शकतो. यामुळे संगमनेर शहर, अकोले शहर आणि परिसरातील अनेक लोकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण होईल.

ही वीज वाहिनी केवळ पाईप लाईनवरच नाही, तर स्मशानभूमी, मंदिरे, दुकाने, लोकांची घरे आणि वर्दळीच्या संगमनेर-अकोले रस्त्यालगतही टाकली जात आहे. यामुळे सार्वजनिक सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. काही पोल थेट रस्त्याच्या कडेला उभे असल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.

केवळ चिखलीच नाही, तर संगमनेर नगर परिषद, गुंजाळवाडी, राजापूर, आणि धांदरफळ बुद्रुक या परिसरातील ग्रामपंचायतींनीही ठराव मंजूर करून या प्रकल्पाला विरोध केला आहे. मात्र, अद्याप कोणत्याही संबंधित अधिकाऱ्याने याची दखल घेतलेली नसल्याचे या पत्रात म्हटले आहे.

26 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या ग्रामसभेत, ग्रामस्थांनी सर्वानुमते यासंबंधीचा ठराव केला आहे. ठरावात म्हटले आहे की, स्मशानभूमी, वस्तीजवळचे आणि संगमनेर-अकोले रस्त्यालगतचे सर्व पोल 15 दिवसांच्या आत काढून घ्यावेत. जर यावर कार्यवाही झाली नाही, तर महावितरण कंपनीच्या संगमनेर कार्यालयावर आंदोलन, मोर्चा आणि उपोषण करण्याचाही इशारा दिला आहे. यानंतर होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस संबंधित जबाबदार असतील, असे देखील या पत्रात म्हटले आहे. 

दरम्यान एका उद्योगपतीसाठी अनेकांचा मोठा विरोध झूगारून सुरू असलेल्या या कामाविरोधात राज्याचे कार्यतत्पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,286
33 केव्ही उच्चदाब ओव्हरहेड वीज वाहिनी ग्रामसभा चिखली ग्रामपंचायत देवेंद्र फडणवीस श्रमिक मिल्क अँड फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

५ लाख २५ हजार ५११ भाविकांनी एकाच वेळी “वंदे मातरम्”चे सामूहिक गायन करून नवा विश्वविक्रम

27/08/2026

‘ग्रंथराज ज्ञानेश्वरी’ हे नैराश्यावरील प्रभावी औषध; संगमनेरमध्ये व्याख्यानमालेचा उत्साहात शुभारंभ

23/08/2026

शिक्षित वस्तीच्या मध्यभागी अंधश्रद्धेचा अघोरी खेळ: संगमनेरमधील घुलेवाडीत तांत्रिक प्रकारांमुळे खळबळ, सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाई करण्याची नागरिकांची मागणी

22/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शुक्रवार, २८ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar28/08/20260

Annant Ppangarkar आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि ऊर्जावान राहील. तुमचे…

अवैध मावा बनविणाऱ्या दोन कारखान्यांवर धाड; ४.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त, ५ जणांवर गुन्हे दाखल

27/08/2026

अश्विनाथ गड हे सामाजिक एकतेचे प्रतीक : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

27/08/2026

५ लाख २५ हजार ५११ भाविकांनी एकाच वेळी “वंदे मातरम्”चे सामूहिक गायन करून नवा विश्वविक्रम

27/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.