Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कळसुबाई शिखरावर भक्ती आणि साहसाचा संगम: २९ वर्षांची अखंड परंपरा
धार्मिक

कळसुबाई शिखरावर भक्ती आणि साहसाचा संगम: २९ वर्षांची अखंड परंपरा

या वर्षी या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवरात्रीच्या पूर्वसंध्येला मंडळाने स्थापित करावयाच्या घटकलशाचे पूजन करून तो मंडळाला सुपूर्द केला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/09/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

घोटी: महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर असलेल्या कळसुबाई शिखरावर नवरात्रीच्या पावन पर्वात भक्ती, श्रद्धा आणि साहसाचा अनोखा संगम पाहायला मिळत आहे. घोटी येथील कळसुबाई मित्र मंडळाचे गिर्यारोहक गेली २९ वर्षांपासून एक आगळीवेगळी धार्मिक परंपरा जोपासत आहेत. 

१९९७ पासून, हे गिर्यारोहक दरवर्षी न चुकता नवरात्रीमध्ये शिखरावर घटस्थापना करतात आणि विजयादशमीपर्यंत दररोज कळसुबाई मातेची पूजा-अर्चा करण्यासाठी शिखर सर करतात.

या वर्षी या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवरात्रीच्या पूर्वसंध्येला मंडळाने स्थापित करावयाच्या घटकलशाचे पूजन करून तो मंडळाला सुपूर्द केला. यावेळी त्यांनी गिर्यारोहकांच्या श्रद्धा आणि साहसाचे कौतुक केले आणि नवरात्रीच्या शुभेच्छाही दिल्या. 

या भेटीदरम्यान, गिर्यारोहकांनी मुख्यमंत्र्यांना शिखरावर आवश्यक सुविधा आणि आधुनिक सोयी उपलब्ध करून देण्याची विनंती केली, तसेच त्यांनी स्वतः कळसुबाई मातेच्या दर्शनासाठी यावे अशी विनवणीही केली.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, पहाटेच मंडळाच्या गिर्यारोहकांनी शिखर सर करून कळसुबाई मातेचे विधिवत पूजन, आरती आणि घटस्थापना केली. सामान्यतः, एकदा शिखर सर केल्यावर गिर्यारोहकांना विश्रांतीची गरज असते, परंतु कळसुबाई मित्र मंडळाचे सदस्य गेल्या तीन दशकांपासून न थकता आणि न थांबता दररोज हे सर्वोच्च शिखर सर करत आहेत. त्यांची ही अविरत भक्ती आणि पराक्रम हेच त्यांच्या श्रद्धेचे खरे प्रतीक आहे.

या स्तुत्य उपक्रमात संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, शाहीर बाळासाहेब भगत, डॉ. महेंद्र आडोळे, डॉ. कैलास गायकर, निलेश आंबेकर, निलेश पवार, प्रवीण भटाटे, बाळू आरोटे, अशोक हेमके, बाळू भोईर, राजेंद्र माने, भगवान तोकडे, नाना टाकळकर, विकास जाधव, गजानन चव्हाण, ज्ञानेश्वर मांडे, चेतन जाधव आणि इतर गिर्यारोहक सहभागी आहेत.

कळसुबाई शिखरावर सुरू असलेली ही भक्ती, शौर्य आणि श्रद्धेची परंपरा केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर देशभरातील गिर्यारोहक आणि भाविकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 910
कळसुबाई मित्र मंडळ कळसुबाई शिखर घटस्थापना
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय

30/09/2026

आश्वी पोलिसांच्या दडपशाहीने विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न; गणेश मंडळांचा संताप, चौकशीची मागणी

26/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

By Annant Ppangarkar12/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसेस दाखल झाल्या असून, यामुळे…

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.