Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पुणे-नाशिक महामार्गावर चंदनापुरीजवळ भीषण अपघात, महिलेचा मृत्यू तर चौघे गंभीर जखमी
अपघात

पुणे-नाशिक महामार्गावर चंदनापुरीजवळ भीषण अपघात, महिलेचा मृत्यू तर चौघे गंभीर जखमी

सर्वजण बजरंग वाडी, कर्जत येथील रहिवासी आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/09/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – पुणे-नाशिक महामार्गावर चंदनापुरी गावाजवळ गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. संगमनेरकडून पुण्याकडे जाणाऱ्या कार आणि समोरून येणाऱ्या आयशर टेम्पो यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून, कारमधील चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. एमएच १२ एफ १४२१ क्रमांकाची कार पुण्याकडे जात होती, तर एमएच १३ सीयू ९१५६ क्रमांकाचा आयशर टेम्पो संगमनेरच्या दिशेने येत होता. दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाल्याने कारमधील प्रवासी गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच डोळासणे महामार्ग केंद्राचे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना संगमनेरमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

या अपघातात कारमधील ५५ वर्षीय सुभद्रा बाळू रुपनर यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यासोबत असलेले राजेंद्र बाळू रुपनर (वय ३८), संजय बाळू रुपनर (वय ३७) आणि मास्टर आरुष राजेंद्र रुपनर (वय ११) हे देखील जखमी झाले. दुर्दैवाने, याच अपघातात ४० वर्षीय लता काळे यांचा मृत्यू झाला. हे सर्वजण बजरंग वाडी, कर्जत येथील रहिवासी आहेत.

या मार्गावरील हिवरगाव पावसा टोलनाका ते जावळे वस्ती या भागात सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतूक एकेरी करण्यात आली आहे. यामुळे अनेकदा अपघात घडत आहेत. एकेरी वाहतुकीमुळे आणि ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अनेक वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे महामार्गावरील दुहेरी वाहतूक कधी सुरू होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 3,269
अपघात चंदनापुरी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026

नाशिक-पुणे बायपासवर भीषण अपघात: बुलेटची कंटेनरला धडक, तरुणाचा मृत्यू

05/10/2026

माजी खासदारावर गुन्हा दाखल

01/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

By Annant Ppangarkar12/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसेस दाखल झाल्या असून, यामुळे…

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.