Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; सात महिला कामगारांचा मृत्यू
अपघात

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; सात महिला कामगारांचा मृत्यू

महिन्यातील दुसरी मोठी दुर्घटना आहे. यापूर्वी ६ मार्च रोजी छत्रपती संभाजीनगरजवळील वरझडी परिसरात अशाच प्रकारे रस्ते कामावर असलेल्या मजुरांना भरधाव ट्रकने चिरडले होते. त्या अपघातात तीन मजुरांचा मृत्यू झाला होता.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

जालना:
समृद्धी महामार्गावर बुधवारी सायंकाळी एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. नागपूरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव वाहनाने कामगारांच्या उभ्या वाहनाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सात महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य १० ते १२ मजूर गंभीर जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये निधोना येथील अलकाबाई दादाराव आदमाने, मीना परमेश्वर आदमाने, कांचनबाई प्रकाश आदमाने, लक्ष्मीबाई संतोष मदन, सुमनबाई कचरू आदमाने आणि केळीगव्हाण येथील कडुबाई रामदास मदन व ताराबाई गहेनाजी चौधरी यांचा समावेश आहे. अपघातानंतर महामार्गावर रक्ताचा सडा पडला होता आणि मृतदेहांचा खच पडला होता, हे दृश्य अत्यंत हृदयद्रावक होते.
मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील कडवंचीनजीक हे सर्व मजूर समृद्धी महामार्गावर सफाईचे काम आटोपून आपल्या वाहनात बसत होते. त्याच वेळी पाठीमागून आलेल्या भरधाव वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.
घटनेची माहिती मिळताच जखमींना उपचारासाठी तातडीने जालन्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर आणि आमदार अर्जुन खोतकर यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस केली.
विशेष म्हणजे समृद्धी महामार्गावरील ही एका महिन्यातील दुसरी मोठी दुर्घटना आहे. यापूर्वी ६ मार्च रोजी छत्रपती संभाजीनगरजवळील वरझडी परिसरात अशाच प्रकारे रस्ते कामावर असलेल्या मजुरांना भरधाव ट्रकने चिरडले होते. त्या अपघातात तीन मजुरांचा मृत्यू झाला होता. सातत्याने होणाऱ्या या अपघातांमुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा आणि वेगाच्या मर्यादेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून मृतांच्या गावांवर सध्या शोककळा पसरली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 790
अपघात समृद्धी महामार्ग
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026

नाशिक-पुणे बायपासवर भीषण अपघात: बुलेटची कंटेनरला धडक, तरुणाचा मृत्यू

05/10/2026

माजी खासदारावर गुन्हा दाखल

01/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.