Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

26/08/2026

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

‘कर्माकडून कृतार्थतेकडे’ जाण्यासाठी प्रत्येक कृतीत ईश्वरभाव जागवा: डॉ. संजय मालपाणी

25/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर तालुक्यात भीषण अपघात; आयशर टेम्पोच्या धडकेत चुलती-पुतणीचा जागीच मृत्यू
अपघात

संगमनेर तालुक्यात भीषण अपघात; आयशर टेम्पोच्या धडकेत चुलती-पुतणीचा जागीच मृत्यू

जया दत्तात्रय थोरात (वय २९) आणि अस्मिता दादाभाऊ थोरात (वय १६, दोन्ही रा. मोधळवाडी) अशी मृतांची नावे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/05/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर तालुक्यात भीषण अपघात; आयशर टेम्पोच्या धडकेत चुलती-पुतणीचा जागीच मृत्यू

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव देपा शिवारातील मोधळवाडी घाटात मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास एक हृदयद्रावक अपघात घडला. एका भरधाव आयशर टेम्पोने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या या भीषण अपघातात चुलती आणि पुतणीचा जागीच मृत्यू झाला.

जया दत्तात्रय थोरात (वय २९) आणि अस्मिता दादाभाऊ थोरात (वय १६, दोन्ही रा. मोधळवाडी) अशी मृतांची नावे असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जया थोरात आणि अस्मिता थोरात या दुचाकीवरून मोधळवाडी घाट उतरत होत्या. याच वेळी समोरून घाट चढून येणाऱ्या आयशर टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे दुचाकीवरील दोघीही खाली पडल्या आणि टेम्पोच्या चाकाखाली चिरडल्या गेल्या. हा अपघात इतका भीषण होता की, त्या दोघांचाही जागीच अंत झाला. घटनेनंतर चालक आपला टेम्पो सोडून घटनास्थळावरून पसार झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि घारगाव पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त टेम्पो ताब्यात घेतला आणि दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठवले.

याप्रकरणी घारगाव पोलीस फरार चालकाचा शोध घेत आहेत. एकाच कुटुंबातील दोन जणींचा असा दुर्दैवी अंत झाल्याने मोधळवाडी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 968
अपघात मृत्यू
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दुःखावर दुःखाचा डोंगर! नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी आलेल्या महिलेचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

21/08/2026

संगमनेरच्या डॉक्टरवर राहता पोलिसात गुन्हा दाखल! एकाचा मृत्यू, एक गंभीर

21/08/2026

पर्यटकांच्या भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत आरुषी कर्पे या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

02/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar26/08/20260

आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस व्यवसाय आणि कामाच्या दृष्टीने प्रगतीचा आहे. कामातील पराक्रम आणि…

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

‘कर्माकडून कृतार्थतेकडे’ जाण्यासाठी प्रत्येक कृतीत ईश्वरभाव जागवा: डॉ. संजय मालपाणी

25/08/2026

पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

25/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.