Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संत तुकारामांच्या अभंगातील ओळींचा उल्लेख करत आमदार सत्यजित तांबेंनी वाढदिवस साजरा न करण्याचा घेतला निर्णय! होर्डिंग बॅनर न लावता डिजिटल माध्यमातून…
राजकारण

संत तुकारामांच्या अभंगातील ओळींचा उल्लेख करत आमदार सत्यजित तांबेंनी वाढदिवस साजरा न करण्याचा घेतला निर्णय! होर्डिंग बॅनर न लावता डिजिटल माध्यमातून…

हार-तुरे, पुस्तके किंवा भेटवस्तू मी काहीही स्वीकारणार नाही. होर्डिंग/बोर्ड लावणाऱ्यांनी अनधिकृत बोर्ड लावूच नयेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/09/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर – नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी आपला वाढदिवस यावर्षी वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढदिवसाच्या अनुषंगाने त्यांचा एक मेसेज समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहे. 

काय म्हटले आहे तांबे यांनी या मेसेजमध्ये…

प्रिय मित्र-मैत्रिणींनो,

खरंतर 27 सप्टेंबरला माझा वाढदिवस आहे… दरवर्षी आपण सर्वजण मला प्रत्यक्ष अथवा डिजिटल माध्यमातून शुभेच्छा देता. तुमचे प्रेम व आपला ऋणानुबंध साजरा करण्याचा तो दिवस असतो. त्यामुळेच अनेकदा मला आवडत नसतानाही मी हा दिवस साजरा करतो, कारण तो दिवस आपल्याला भेटण्याची एक संधी असते.

राजकीय-सामाजिक जीवनात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने हा एक अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम होऊन जातो. आणि स्पर्धेच्या युगात मलाही आवडत नसतानाही अनेक गोष्टी कराव्या लागतात.

माझे अनेक बिगर राजकीय मित्र कायम मला विचारतात की, राजकीय लोक वाढदिवस इतके मोठे साजरे का करतात? का रस्त्यांवर कार्यक्रम घेतात? का होर्डिंग/बोर्ड लावून शहरे-गावे विद्रूप करतात? खरं तर याचे उत्तर म्हणजे स्पर्धा. ह्या स्पर्धेत राजकीय कार्यकर्ते लोकांना भेटण्याची अथवा त्यांच्याशी संवाद साधण्याची कोणतीही संधी सोडू शकत नाहीत.

अनेकदा माझ्या वाढदिवसानिमित्त येणाऱ्या मित्रपरिवाराकडे पाहिले तर अनेक जणांना अपार कष्ट घेऊन यावे लागते. वेळ, पैसा, ऊर्जा सगळं खर्च होतं. म्हणूनच मला ते आवडत नाही. तरीही मागच्या वर्षी सगळ्यांच्या आग्रहाखातर आपण शिवजन्मभूमी शिवनेरी येथे जाऊन स्वच्छता मोहीम राबवली. खूप मजा आली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मित्रपरिवार आला.

हे सगळं जरी खरं असलं तरी… संत तुकाराम म्हणतात तसे

उपाधी दाटणी प्रतिष्ठा गौरव ।

होय माझा जीव कासावीस ॥

ह्या सगळ्या प्रतिष्ठा आणि गौरव माझ्या मित्रपरिवाराच्या कष्टापेक्षा मोठे नाहीत. त्यामुळेच कोणालाही त्रास व्हावा अशी माझी इच्छा नाही.

यामुळेच यंदाचा वाढदिवस साजरा न करण्याचा मी निर्णय घेतला आहे. 27 तारखेचा माझा दिवस हा नेहमीसारखाच एक सामान्य दिवस असेल. मी कुठेतरी काहीतरी कामातच व्यस्त असेन. हार-तुरे, पुस्तके किंवा भेटवस्तू मी काहीही स्वीकारणार नाही. होर्डिंग/बोर्ड लावणाऱ्यांनी अनधिकृत बोर्ड लावूच नयेत. मी आपल्या शुभेच्छा फोनवर, एसएमएसद्वारे किंवा सोशल मीडियावर नक्कीच स्वीकारेल.

प्रेम आहेच, ते अधिक वृद्धिंगत व्हावे हीच एक अपेक्षा!

आपलाच, सत्यजीत तांबे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 486
वाढदिवस सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

By Annant Ppangarkar11/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यात विविध ठिकाणांहून देवीच्या पायी ज्योती आणण्याची धार्मिक…

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.