Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात गुन्हेगारांचा उच्छाद! घरी परतणाऱ्या तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; आरोपींना ‘मोक्का’ लावण्याची मागणी
गुन्हेगारी

संगमनेरात गुन्हेगारांचा उच्छाद! घरी परतणाऱ्या तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; आरोपींना ‘मोक्का’ लावण्याची मागणी

अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी या सराईत गुन्हेगारांवर मोक्का (MCOCA) आणि एमपीडीए (MPDA) कायद्यांतर्गत कठोर कारवाई करून त्यांना त्वरित अटक करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर: शुक्रवारी रात्री घोडेकर मळ्यामध्ये म्हाळुंगी नदीच्या पुलावर गुन्हेगारांकडून घरी परतणारा तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी असलेल्या या तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या संदर्भात प्रभाग १३ मधील रहिवाशांनी एकत्रित येत सराईत गुन्हेगारांवर कारवाईची मागणी केली आहे.

शुक्रवारी (१७ ऑक्टोंबर) रात्री साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान शुभम सुरेश भोईर हा तरुण कापड दुकानातील काम संपवून घरी परतत असताना साईनगर परिसरातील म्हाळुंगी नदीच्या पुलावर काही सराईतानी त्याला अडवले. त्याच्याकडून पैसे जबरदस्तीने काढून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. शुभम भोईर याने विरोध करताच, या गुन्हेगारांनी त्याला जबर मारहाण केली, तसेच धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले.

या गुन्हेगारी कृत्यामुळे संगमनेर शहरात सराईत गुन्हेगारांची दहशत वाढली असल्याचे समोर आले असून, रात्री-अपरात्री निष्पाप नागरिकांना अडवून त्यांच्याकडील पैसे, दागिने हिसकावणे तसेच विरोध केल्यास गंभीर मारहाण करण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या वाढत्या गुन्हेगारीमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

या संदर्भात प्रभाग क्र. १३ मधील चव्हाणपुरा, साईनगर, घोडेकर मळा आदी परिसरातील रहिवाशांनी आज, शनिवारी (१८ ऑक्टोबर) संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी शहरात वारंवार घडणाऱ्या गंभीर गुन्हेगारी घटनांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे, या घटनेतील आरोपी हे तेच तेच असून त्यांच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. कायद्याचा धाक न राहिलेल्या या गुन्हेगारांमुळे शहरात कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे. गुन्हेगारीचे गांभीर्य लक्षात घेऊन, नागरिकांनी या टोळीवर तातडीने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

तसेच, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी या सराईत गुन्हेगारांवर मोक्का (MCOCA) आणि एमपीडीए (MPDA) कायद्यांतर्गत कठोर कारवाई करून त्यांना त्वरित अटक करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

पोलीस प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई न केल्यास, ऐन दिवाळीत प्रभाग क्र. १३ मधील चव्हाणपुरा, साईनगर, घोडेकर मळा, पंपिंग स्टेशन, जेधे कॉलनी, काठे मळा या भागातील नागरिक एकत्र येऊन मोठे जनआंदोलन उभे करतील, असा इशाराही रहिवाशांनी दिला आहे. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी संगमनेर शहर पोलीस स्टेशनची असेल, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 2,815
गुन्हेगारी मारहाण संघटित गुन्हेगारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.