Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मतदार याद्या पडताळणीसाठी (SIR) संगमनेरमध्ये राहुल गांधी समर्थक संघ आक्रमक! तहसीलदारांना निवेदन
सामाजिक

मतदार याद्या पडताळणीसाठी (SIR) संगमनेरमध्ये राहुल गांधी समर्थक संघ आक्रमक! तहसीलदारांना निवेदन

वास्तविक पाहता, केरळ आणि महाराष्ट्रातील परिस्थिती समान आहे आणि दोन्ही राज्यांचे निवडणूक वेळापत्रक समान आहे. असे असतानाही, या दोन्ही राज्यांसाठी वेगवेगळे निकष लावण्यामागे निवडणूक आयोगाचा नेमका काय हेतू आहे,
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर – संगमनेर विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांची सखोल पडताळणी (Systematic Inspection of Rolls – SIR) मोहीम राबवावी, या मागणीसाठी ‘राहुल गांधी समर्थक संघ’ आक्रमक झाला आहे. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज (मंगळवारी 28 ऑक्टोबर) संगमनेरच्या तहसीलदारांना याबाबत लेखी निवेदन देऊन तातडीने कार्यवाहीची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याच्या तक्रारी वारंवार विविध माध्यमांतून समोर आल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी या याद्यांची SIR द्वारे सखोल पडताळणी होणे अत्यंत आवश्यक आहे.
राज्यव्यापी संघटनेने निवेदनात केरळ राज्याच्या परिस्थितीचा दाखला दिला आहे. पुढच्या महिन्यात केरळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून, तेथे सध्या मतदार याद्यांची सखोल पडताळणी मोहीम (SIR) जोरात सुरू आहे. याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळच्या निवडणुकीची अधिसूचना अद्याप निघाली नसल्याने तेथे SIR सुरू आहे.
‘समान परिस्थितीत वेगवेगळे निकष का?’ – संघाचा सवाल:
राहुल गांधी समर्थक संघाने याच मुद्द्यावर निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणतात की, जर मतदार याद्यांमधील घोळ सिद्ध झाला असेल आणि SIR न राबवण्यास केवळ ‘निवडणूक अधिसूचना’ हाच एकमेव अडथळा असेल, तर महाराष्ट्र आणि संगमनेरमध्ये ही प्रक्रिया राबवण्यास कोणतीही हरकत नसावी.
वास्तविक पाहता, केरळ आणि महाराष्ट्रातील परिस्थिती समान आहे आणि दोन्ही राज्यांचे निवडणूक वेळापत्रक समान आहे. असे असतानाही, या दोन्ही राज्यांसाठी वेगवेगळे निकष लावण्यामागे निवडणूक आयोगाचा नेमका काय हेतू आहे, याचा खुलासा सर्वसामान्य मतदारांपुढे होण्याची गरज आहे.
निवेदनाच्या समारोपामध्ये राहुल गांधी समर्थक संघाने निवडणूक प्रक्रियेवरील देशातील जनतेचा विश्वास पुनश्च बहाल करण्यासाठी निवडणूक आयोगाने तहसीलदारांमार्फत निष्पक्ष काम करावे, अशी भूमिका मांडली आहे. तहसीलदारांनी आपल्या मागणीचा गंभीर्याने विचार करून राज्य निवडणूक आयोगास योग्य तो पत्रव्यवहार करावा आणि ही मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचवावी, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.
नायब तहसीलदारांनी संघटनेचे निवेदन स्वीकारले असून, तहसीलदारांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात राहुल गांधी समर्थक संघ, महाराष्ट्राचे पदाधिकारी अमोल शेलकर, राम अरगडे, प्रकाश कडलग, सतीश खताळ, मोहसीन शेख, कल्याण जोर्वेकर, अरुण गावित्रे अक्षय मोहिते, शंतनू भालेकर, रवींद्र हासे अनिल राऊत, भारत कळसकर आदींचा समावेश होता.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 924
तहसीलदार धार्मिक स्थळ निवेदन राहुल गांधी समर्थक संघ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

By Annant Ppangarkar11/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या…

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.