Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरसाठी दीड कोटींची भेट! १८ गावांना मिळणार नवीन ट्रान्सफॉर्मर, वीज समस्या मार्गी! आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांतून ‘जिल्हा नियोजन’ मधून मोठा निधी मंजूर
राजकारण

संगमनेरसाठी दीड कोटींची भेट! १८ गावांना मिळणार नवीन ट्रान्सफॉर्मर, वीज समस्या मार्गी! आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांतून ‘जिल्हा नियोजन’ मधून मोठा निधी मंजूर

आमदार तांबे यांनी 'जिल्हा नियोजन'मधून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचेही आभार मानले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/11/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – संगमनेर तालुक्यातील १८ गावांतील शेतकरी आणि नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. येथील वीजपुरवठा व्यवस्थेतील त्रुटी दूर करून स्थिर व अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नातून तब्बल दीड कोटी रुपयांचा निधी नवीन ट्रान्सफॉर्मरसाठी मंजूर झाला आहे. ‘जिल्हा नियोजन’मधून मिळालेल्या या भरीव निधीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांची आणि विशेषतः शेतकऱ्यांची दीर्घकाळापासूनची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.

या निधीतून नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येणाऱ्या १८ गावांमध्ये प्रामुख्याने अंभोरे, कुंभारवाडी, कोळवडे, घुलेवाडी, जाखोरी, जोर्वे, डिग्रस, तळेगाव, नांदुरी दुमाला, मांडवे बु., मालुंजे, रणखांब वाडी, राजापूर, वरवंडी (जनतानगर), हिवरगाव पावसा, मालुंजे आणि संगमनेर खुर्द या गावांचा समावेश आहे.

या भागात अनेक वर्षांपासून कमी वीजदाब, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि त्यामुळे सिंचनात येणारे अडथळे अशा समस्या होत्या. या समस्यांमुळे शेतीचे मोठे नुकसान होत होते आणि नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत होता. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार तांबे यांनी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या याच प्रयत्नांना यश आले असून, आता नवीन ट्रान्सफॉर्मरमुळे ही समस्या पूर्णपणे संपुष्टात येणार आहे.

आमदार तांबे यांनी निधी मंजुरीबद्दल बोलताना सांगितले की, संगमनेर तालुक्यातील वीजपुरवठा अधिक सक्षम व्हावा, शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेशी वीज उपलब्ध व्हावी आणि नागरिकांना अखंड सेवा मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यांनी ‘जिल्हा नियोजन’मधून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचेही आभार मानले.

या निर्णयामुळे संगमनेर तालुक्यातील वीज वितरण प्रणाली अधिक सक्षम होणार असून, यामुळे शेती, उद्योग आणि एकूणच ग्रामीण विकासाचा वेग अधिक वाढेल. हा निधी म्हणजे जनतेच्या समस्या ऐकून त्यावर सातत्याने पाठपुरावा करून मिळवलेला जनतेसाठीचा खरा विकास असल्याची भावना व्यक्त होत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,596
जिल्हा नियोजन समिती ट्रान्सफॉर्मर निधी सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

By Annant Ppangarkar14/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘सुदर्शन’ निवासस्थानी…

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.