Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

धुळ्यात ४० हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर आणि पोलीस शिपाई रंगेहात जाळ्यात; तळेकर काही काळ संगमनेर शहर पोलीस ठाण्यात होते कार्यरत

August 4, 2026

रोटरी क्लबच्या निवडी जाहीर, यांचा झाला पदग्रहण समारंभ

August 4, 2026

सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करून जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणारा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं

August 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पोलीस ठाण्यात आणताना मोठा गोंधळ; ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
गुन्हेगारी

रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पोलीस ठाण्यात आणताना मोठा गोंधळ; ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरNovember 8, 2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर: रेकॉर्डवरील एका गुन्हेगाराला पोलीस ठाण्यात घेऊन येत असताना काही व्यक्तींनी भररस्त्यात गाडी आडवी लावून पोलिसांना शिवीगाळ करत मोठा गोंधळ घातल्याची गंभीर घटना संगमनेर शहर पोलीस ठाण्यासमोर शुक्रवारी (दि. ७ नोव्हेंबर) दुपारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल रामकिसन मुखरे आणि कॉन्स्टेबल आगलावे हे रेकॉर्डवरील गुन्हेगार सागर बाळू गायकवाड याला पोलीस ठाण्यात घेऊन येत होते. यावेळी तहसील कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती. काही जणांनी त्यांची गाडी रस्त्यात आडवी उभी केल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

यावेळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी संबंधित वाहनचालकांना गाडी बाजूला घेण्याची सूचना केली. यानंतर मनोज गायकवाड, अमोल भोसले, नितीन वाघमारे आणि त्यांच्यासोबत असलेल्या तीन महिलांनी पोलिसांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. एवढेच नव्हे तर, त्यांनी पोलिसांना धमक्या देत सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

आरोपींनी सरकारी कामात अडथळा आणल्याने पोलीस कॉन्स्टेबल रामकिसन मुखरे यांनी तातडीने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी वरील सहाही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१, २२१, ३५२ आणि ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,117
संगमनेर पोलीस सरकारी कामात अडथळा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

धुळ्यात ४० हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर आणि पोलीस शिपाई रंगेहात जाळ्यात; तळेकर काही काळ संगमनेर शहर पोलीस ठाण्यात होते कार्यरत

August 4, 2026

सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करून जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणारा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं

August 4, 2026

२ लाखांच्या बदल्यात ८ लाखांचे आमिष! खेळण्यातील नोटांचा वापर; ४ भामट्यांवर गुन्हा दाखल, ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’च्या नोटांच्या जोरावर नोटा बदलणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड

August 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

धुळ्यात ४० हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर आणि पोलीस शिपाई रंगेहात जाळ्यात; तळेकर काही काळ संगमनेर शहर पोलीस ठाण्यात होते कार्यरत

By अनंत पांगारकरAugust 4, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  धुळे: पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर यांच्यावर धुळे…

रोटरी क्लबच्या निवडी जाहीर, यांचा झाला पदग्रहण समारंभ

August 4, 2026

सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करून जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणारा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं

August 4, 2026

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले…

August 4, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.