Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश! स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, सव्वाबारा लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश! स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, सव्वाबारा लाखांचा मुद्देमाल जप्त

शहर पोलिसांच्या नाकासमोर सुरू असलेल्या या कत्तलखान्याकडे स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे. गुन्हे शाखेला जमते ते स्थानिक पोलिसांना का जमत नाही? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/11/2025Updated:12/11/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – प्रतिनिधी

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने संगमनेर शहरात मोठी कारवाई करत गोवंश कत्तल आणि गोमांस विक्री करणाऱ्या आरोपींकडून तब्बल १२ लाख ४१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे. शहर पोलिसांच्या नाकासमोर सुरू असलेल्या या कत्तलखान्याकडे स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे. गुन्हे शाखेला जमते ते स्थानिक पोलिसांना का जमत नाही? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली ही महत्त्वपूर्ण कारवाई यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे कौतुक होत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिले होते.

या आदेशावरून, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, संतोष खैरे, अमृत आढाव, योगेश कर्डीले, आणि चालक अरुण मोरे यांचे पथक संगमनेर येथे कारवाईसाठी आले होते.

पथकाला सोमवारी (दि. १० नोव्हेंबर) संगमनेर शहर पोलीस स्टेशन परिसरात माहिती मिळाली की, साहील उर्फ साद कुरेशी (रा. जमजम कॉलनी, संगमनेर) हा त्याचे साथीदारांसह शाहीद गणी कुरेशी यांच्या घराच्या पत्र्याच्या शेडमध्ये गोमांसाची विक्री करत आहे. या माहितीच्या आधारे, पथकाने गल्ली क्रमांक ९, जमजम कॉलनी येथील शाहीद कुरेशी यांच्या शेडजवळ छापा टाकण्यासाठी गेले.

पथकाला पाहताच, दोन व्यक्ती एका टेम्पोमध्ये गोमांस भरत असताना पळून जाऊ लागले. पोलिसांनी पाठलाग करून एका आरोपीस ताब्यात घेतले, तर दुसरा फरार होण्यात यशस्वी झाला.

या प्रकरणी, साहिल उर्फ साद मुस्ताफ कुरेशी (वय २२ वर्षे, रा. गल्ली नं. ०९, जमजम कॉलनी, संगमनेर) यास अटक करण्यात आली आहे. तर, तरबेज व आलासहाब (दोघेही रा. अलकानगर, संगमनेर) हे दोघे फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. आरोपींकडून घटनास्थळावरून एकूण १२ लाख ४१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अटक केलेल्या आरोपीविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १०००/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २७१, ३२५, ३(५) आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५ (अ), ५ (ब), ५ (क), ९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन करत आहे. 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 926
अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा कत्तलखाना कारवाई कत्तलखाना छापा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर शहरातील बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेल्या एमडी ड्रग प्रकरणाला आता…

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.