Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निवडणूक आयोग सत्तेचा गुलाम झाला! – बाळासाहेब थोरात यांची टीका; EVM वर गंभीर आक्षेप
राजकारण

निवडणूक आयोग सत्तेचा गुलाम झाला! – बाळासाहेब थोरात यांची टीका; EVM वर गंभीर आक्षेप

आमदार सत्यजित तांबे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कायम विकासाची कामे केल्याचे नमूद केले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/12/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर टीका करत, आयोग पूर्णपणे सत्तेचा गुलाम झाल्याचे म्हटले आहे. निवडणूक कार्यक्रम मंत्रालयातील कोणीतरी पीए ठरवत असून आयोग त्याची अंमलबजावणी करत असल्याचा खळबळजनक आरोप थोरात यांनी केला. तसेच, मतदान आणि मतमोजणीतील २० दिवसांच्या अंतरावर आक्षेप घेत, EVM (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) पेट्यांच्या सुरक्षेबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

माध्यमांशी बोलताना थोरात म्हणाले की, राज्यघटना आणि लोकशाही टिकवण्यासाठी मतदान प्रक्रिया निर्वेधपणे पार पडणे अत्यंत महत्त्वाचे आहे, परंतु सध्या गोंधळाची परिस्थिती आहे. दोन दिवसांवर निवडणूक प्रक्रिया येते आणि अचानक मतदान स्थगित केले जाते, असा प्रकार यापूर्वी कधीच घडला नाही. सावळा गोंधळ चालू असल्याचे दिसते, असे ते म्हणाले.

थोरात यांनी स्पष्ट मत व्यक्त केले की, निवडणूक आयोगाने मतदानासाठी निर्दोष कार्यक्रम जाहीर केला पाहिजे. मात्र असे होत नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे. निवडणूक आयोगातील अधिकारी उच्च पदस्थ आणि अनुभवी असूनही ते सत्तेच्या दबावाखाली काम करत आहेत. निवडणूक आयोग स्वतंत्रपणे निर्णय घेत नाही, तर मंत्रालयातील पीए कार्यक्रम आखतो आणि आयोग तो जाहीर करतो, अशी थेट टीका त्यांनी केली.

थोरात यांनी मतदार याद्यांमधील गोंधळावरही तीव्र आक्षेप घेतला. या त्रुटींबाबत वारंवार दाद मागूनही राजकीय हस्तक्षेपामुळे त्यात सुधारणा होत नसल्याचे ते म्हणाले. “मतदार यादीतील गोंधळ आणि ईव्हीएमबाबत ते (सत्ताधारी) काहीही करू शकतात, हे सर्व देशाने पाहिले आहे,” असे सांगत त्यांनी EVM आणि संपूर्ण प्रक्रियेवरच शंका उपस्थित केली.

राज्यघटना आणि देश टिकवण्यासाठी लोकशाहीमध्ये मतदान प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. मतदान प्रक्रिया निर्वेधपणे पार पडली तरच लोकांचा लोकशाहीवर विश्वास राहील. आज मतदान झाल्यानंतर उद्याच मतमोजणी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. कारण २० दिवसात ईव्हीएम पेट्यांचे काय होईल, याबाबत सर्व देशातील जनतेला शंका आहे. सत्ताधाऱ्यांचे वागणे असे आहे की शंका येणे साहजिक आहे, असे मत थोरात यांनी व्यक्त केले.

दरम्यान, तब्बल ९ वर्षांनंतर संगमनेर पालिकेची निवडणूक होत असल्यामुळे नागरिकांमध्ये मतदानाबद्दल मोठा उत्साह दिसून आला. सकाळीच नागरिकांनी प्रत्येक मतदान केंद्रावर रांगा लावल्या होत्या.

यावेळी आमदार सत्यजित तांबे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कायम विकासाची कामे केल्याचे नमूद केले. संगमनेर तालुका आणि शहर हे एक परिवार असून जनतेचा आमच्यावर विश्वास आहे. सेवा समितीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास तांबे यांनी व्यक्त केला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 822
निवडणूक बाळासाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आर्थिक

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सोशल मीडियावरील रिल्स, भ्रामक ट्रेंड आणि ऑनलाइन चर्चांच्या…

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘एक विद्यार्थी, एक बेंच’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; आठवडाभरात ६८ हजारांच्या लोकसहभागातून ४० बेंचचे लोकार्पण

08/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.