Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महाराष्ट्रातील सर्वात मोठी कारवाई: नाशिक नार्कोटिक्स पथकाकडून संगमनेरमध्ये सव्वा कोटीच्या गांजाचा महासाठा जप्त, मुख्य आरोपी फरार; स्थानिक पोलिसांची ‘भूमिका’ संशयाच्या भोवऱ्यात
गुन्हेगारी

महाराष्ट्रातील सर्वात मोठी कारवाई: नाशिक नार्कोटिक्स पथकाकडून संगमनेरमध्ये सव्वा कोटीच्या गांजाचा महासाठा जप्त, मुख्य आरोपी फरार; स्थानिक पोलिसांची ‘भूमिका’ संशयाच्या भोवऱ्यात

नार्कोटिक्स विभागाने आता फरार आरोपी पडवळ याच्यासह या रॅकेटचे मुख्य सूत्रधार कोण आहेत, माल कोणाकडून येत होता आणि कोणाला पुरवला जात होता, याचा सखोल तपास सुरू केला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/12/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – 

संगमनेर शहरालगत असलेल्या सुकेवाडी परिसरात नाशिक नार्कोटिक्स विभागाने स्थानिक पोलिसांना सोबत घेत एक मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत तब्बल सव्वा कोटी रुपये किमतीचा ४५६ किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईमुळे संगमनेरमधील अंमली पदार्थांच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असला तरी, स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कारवाईनंतर मुख्य आरोपी तुषार उत्तम पडवळ उर्फ दमल्या (रा. सुकेवाडी, ता. संगमनेर) हा फरार झाला आहे.

नाशिक येथील नार्कोटिक्स डिपार्टमेंटचे पोलीस उपअधिक्षक गुलाबराव पाटील यांना सुकेवाडी गावात अमली पदार्थांची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर उपअधिक्षक पाटील यांनी तातडीने एक पथक तयार करून सुकेवाडी येथे धाड टाकली.

आरोपी तुषार पडवळ उर्फ दमल्या याच्या घराची झडती घेतली असता, सुरुवातीला ३०० किलो गांजा घरात मिळून आला. त्यानंतर परिसरातील एका छोटा हत्ती टेम्पोची तपासणी केली असता, त्यात आणखी १५६ किलो गांजा पाकिटांमध्ये पॅक करून ठेवलेला आढळला. अशा प्रकारे एकूण ४५६ किलो सुका गांजा, तसेच अन्य वस्तू असा सुमारे सव्वा कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

या कारवाईत उपअधिक्षक गुलाबराव पाटील यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत व्यवहारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज खरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली.

एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा शहरालगत सापडणे, ही बाब गंभीर आहे. नाशिकचे पथक थेट संगमनेरात येऊन कोट्यवधी रुपयांचा गांजा पकडते, मात्र स्थानिक संगमनेर शहर पोलिसांना याबाबत कानोकान खबर नसावी, यावर आता जोरदार टीका होत आहे.

शहर पोलीस ठाण्याचा नव्याने पदभार घेतलेल्या पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी अद्याप अवैध धंद्यावर कोणतीही कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. अपवाद वगळता केवळ किरकोळ गुन्हे हाताळण्यात पटाईत असलेले येथील पोलीस इतक्या मोठ्या रॅकेटकडे दुर्लक्ष कसे करू शकतात, असा सवाल जनतेकडून विचारला जात आहे. अनेक अवैध धंद्यांना अभय देऊन ‘मोठ्या माशांना’ वाचवण्यासाठी आणि ‘छोट्या माशांना’ गळाला लावून किरकोळ स्वरूपाची कारवाई करण्याचे प्रकार शहरात वाढत असल्याचा गंभीर आरोप होत आहे. फरार आरोपी, चैन स्नॅचिंग, दरोड्याचे गुन्हे अद्यापही उलगडलेले नसताना, सव्वा कोटीचा गांजा पकडण्यासाठी बाहेरच्या पथकाला यावे लागणे, हे स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते.

नार्कोटिक्स विभागाने आता फरार आरोपी पडवळ याच्यासह या रॅकेटचे मुख्य सूत्रधार कोण आहेत, माल कोणाकडून येत होता आणि कोणाला पुरवला जात होता, याचा सखोल तपास सुरू केला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,427
गांजा नासिक नार्कोटिक विभाग
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- कमी पावसामुळे संकटात सापडलेली खरीप पिके आणि आगामी गणेशोत्सवाची…

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.