Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज गुरुवार, १८ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 18, 2026

संगमनेर येथे शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक; खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

June 17, 2026

ठाकरे गटाच्या ६ गद्दार खासदारांचे दिल्लीत लोटांगण; अखेर शिंदेशाहीत विलीन होणार! गद्दारांच्या यादीत शिर्डीचे खासदार!

June 17, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बिबट्याच्या हल्ल्यातील मयत बालकाच्या कुटुंबीयांना शासकीय नोकरी द्यावी! जवळे कडलग येथे बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षाच्या सिद्धेशचा मृत्यू; आमदार अमोल खताळ यांची विधिमंडळात सरकारकडे आग्रही मागणी
महाराष्ट्र संवाद विशेष

बिबट्याच्या हल्ल्यातील मयत बालकाच्या कुटुंबीयांना शासकीय नोकरी द्यावी! जवळे कडलग येथे बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षाच्या सिद्धेशचा मृत्यू; आमदार अमोल खताळ यांची विधिमंडळात सरकारकडे आग्रही मागणी

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मयत बालकाचे आधार कार्ड नसल्यामुळे त्याच्या कुटुंबियांना नियमानुसार मिळणारी नुकसान भरपाई मिळण्यात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी शासनाने तातडीने विशेष विचार करावा आणि मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरDecember 14, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी-
संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील हृदयद्रावक घटनेनंतर, बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या सिद्धेश सूरज कडलग (वय 4) या बालकाच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत देण्यासह कुटुंबातील एका सदस्यास शासकीय नोकरीत सामावून घेण्याची आग्रही मागणी आमदार अमोल खताळ यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विधिमंडळात केली आहे.
जवळे कडलग येथील कडलग वस्तीवर शनिवारी (१३ डिसेंबर) ही दुर्दैवी घटना घडली. सिद्धेश हा घराजवळ खेळत असताना गिन्नी गवतात दबा धरून बसलेल्या नरभक्षक बिबट्याने त्याच्यावर अचानक जीवघेणा हल्ला केला. बिबट्याच्या दातांनी गळा आणि डोक्यावर गंभीर जखमा झाल्याने सिद्धेशचा जागीच मृत्यू झाला. सिद्धेशचे कुटुंब शेती आणि दुग्ध व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करते. घटनेच्या वेळी कुटुंबातील सदस्य शेतात पाणी भरण्याच्या कामात व्यस्त होते. या घटनेमुळे संपूर्ण जवळे कडलग परिसरात शोकाकुल वातावरण असून नागरिकांमध्ये बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे मोठी भीती निर्माण झाली आहे.
आमदार खताळ यांनी ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’च्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधताना सांगितले की, सिद्धेशच्या कुटुंबीयांची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मयत बालकाचे आधार कार्ड नसल्यामुळे त्याच्या कुटुंबियांना नियमानुसार मिळणारी नुकसान भरपाई मिळण्यात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी शासनाने तातडीने विशेष विचार करावा आणि मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
बिबट्यांच्या वाढत्या दहशतीमुळे मानवी वस्तीत भीतीचे वातावरण असल्याने वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, बिबट्यांना जेरबंद करून मानवी वस्तीतून दूर ठेवावे, तसेच या घटनेला कारणीभूत ठरलेल्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे तत्काळ आदेश द्यावेत, अशी मागणी आमदार खताळ यांनी विधिमंडळात केली.
दरम्यान, नरभक्षक बिबट्यावर कारवाईसाठी आदेश दिल्याबद्दल त्यांनी वनमंत्री गणेश नाईक, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्याचे वनाधिकारी विवेक खांडेकर व एम. एस. रेड्डी यांचे आभार मानले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 544
अमोल खताळ आर्थिक मदत बिबट्या हल्ला हिवाळी अधिवेशन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर येथे ‘सत्यशोधक विचारमंच’तर्फे हनुमंत पवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन

June 16, 2026

संगमनेर नजीकच्या आढा ओढ्यात अज्ञात व्यक्तीचा जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ; पोलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू!

June 11, 2026

अकोले तालुक्यात भीषण स्फोट; मासेमारीसाठी नेण्यात येणाऱ्या स्फोटकांचा दुचाकीवरच स्फोट, एक जण गंभीर जखमी

June 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज गुरुवार, १८ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJune 18, 20260

आजचे राशिभविष्य मेष: आजचा दिवस घरातील कामांच्या व्यापात आणि धावपळीत व्यतीत होईल. अनेक कामे एकाच…

संगमनेर येथे शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक; खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

June 17, 2026

ठाकरे गटाच्या ६ गद्दार खासदारांचे दिल्लीत लोटांगण; अखेर शिंदेशाहीत विलीन होणार! गद्दारांच्या यादीत शिर्डीचे खासदार!

June 17, 2026

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा (MACCIA) निवडणूक निकाल जाहीर: अहिल्यानगर जिल्ह्यातील तिन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड, पाहा राज्यातील सर्व विजयी उमेदवारांची यादी!

June 17, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.