Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर येथे शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक; खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
आंदोलन

संगमनेर येथे शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक; खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वाकचौरे यांच्यावर गद्दारीचा तीव्र आरोप केला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 
संगमनेर:
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुन्हा एकदा पक्ष बदल केल्याच्या निषेधार्थ बुधवारी संगमनेर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. पक्षनिष्ठेशी तडजोड करणाऱ्या आणि मतदारांचा विश्वासघात करणाऱ्यांविरोधात भविष्यातही यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमर कतारी व शहर प्रमुख अमित चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी साडेचार वाजता शिवसैनिकांनी एकत्र येत खासदार वाकचौरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. या आंदोलनात संगमनेर शहर आणि तालुक्यातील शिवसैनिक, पदाधिकारी तसेच महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी खासदार वाकचौरे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वाकचौरे यांच्यावर गद्दारीचा तीव्र आरोप केला. यापूर्वीही त्यांनी पक्षाशी प्रतारणा केली होती, मात्र त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांनी माफी मागितली होती. आयुष्यभर शिवसेनेतच राहण्याचे आश्वासन दिल्याने उद्धव ठाकरे यांनी मोठेपणा दाखवत त्यांना पुन्हा शिर्डीतून उमेदवारी दिली आणि ते निवडूनही आले.
मात्र, खासदार म्हणून विजयी होताच त्यांनी पुन्हा निष्ठा बदलून शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या फसवणुकीचा निषेध म्हणून आंदोलकांनी वाकचौरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला साडी नेसवून अनोख्या पद्धतीने संताप व्यक्त केला आणि नंतर त्याचे दहन केले.
या आक्रमक आंदोलनात शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमर कतारी, शहरप्रमुख अमित चव्हाण व फैसल सय्यद, व्यापारी आघाडीचे संभव लोढा, तालुकाप्रमुख भीमाशंकर पावसे, विधानसभा प्रमुख अमोल डुकरे यांच्यासह अशोक बढे, अरुण भालेराव, रवी गिरी, बाळासाहेब घोडके, आसिफ तांबोळी, दीपक साळुंके, राजाभाऊ सातपुते, प्रकाश गायकवाड, सदाशिव हासे, गणेश धात्रक, राजश्रीताई राहणे, त्रिलोक कतारी, आदित्य गायकवाड, प्रशांत खजूरे, कैलास गायके आणि त्रिंबक शिंदे यांसह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 994
अमर कतारी अमित चव्हाण आंदोलन शिवसेना उद्धव ठाकरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा बळी; अतिक्रमण आणि अवजड वाहनांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा; रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियंत्रणासाठी तीव्र आंदोलनाचा अल्टीमेटम

16/09/2026

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर शहरातील बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेल्या एमडी ड्रग प्रकरणाला आता…

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.