Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » काळाचा क्रूर घाला! बापाचे छत्र हरपल्यानंतर दोन्ही चिमुकल्यांचा विहिरीत बुडून दुर्दैवी अंत; गावावर शोककळा, अहिल्यानगर जिल्ह्यात हळहळ
महाराष्ट्र संवाद विशेष

काळाचा क्रूर घाला! बापाचे छत्र हरपल्यानंतर दोन्ही चिमुकल्यांचा विहिरीत बुडून दुर्दैवी अंत; गावावर शोककळा, अहिल्यानगर जिल्ह्यात हळहळ

हे दोन्ही चिमुकले विहिरीत नेमके पडले कसे? हा घातपाताचा प्रकार आहे का? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित असून पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/12/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अकोले | महाराष्ट्र संवाद न्यूज

काही महिन्यांपूर्वीच वडिलांचे छत्र हरपले… पदराखाली दोन काळजाचे तुकडे घेऊन माऊली माहेरी आधार शोधायला आली होती पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. वीरगाव (ता. अकोले) येथे सोमवारी सायंकाळी विहिरीत पडल्याने दोन चिमुकल्या बहीण-भावंडांचा अंत झाला. या घटनेने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, एका दुर्दैवी मातेचा आधारच हिरावला गेल्याने परिसरात सन्नाटा पसरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वीरगाव येथील एका शेतातील विहिरीत दोन बालके पडल्याची धक्कादायक माहिती सोमवारी (दि. १५) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास समोर आली. या घटनेत पीयूष पोपट मेंगाळ (वय ८ महिने) आणि श्रेया पोपट मेंगाळ (वय अडीच वर्षे) या दोन निष्पाप जीवांचा करुण अंत झाला.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी विहिरीकडे धाव घेतली. सोमवारी रात्री उशिरा पीयूषचा मृतदेह शोधण्यात यश आले, तर चिमुकल्या श्रेयाचा मृतदेह मंगळवारी सकाळी रेस्क्यू टीमच्या मदतीने बाहेर काढण्यात आला.

या घटनेतील हृदयद्रावक बाब म्हणजे, या दोन्ही बालकांचे वडील पोपट मेंगाळ (रा. निळवंडे) यांचा अवघ्या ७-८ महिन्यांपूर्वी एका भीषण अपघातात मृत्यू झाला होता. पतीच्या निधनानंतर खचलेली माता आशा मधे ही आपल्या दोन्ही मुलांसह वीरगाव येथे माहेरी वास्तव्यास आली होती. मुलांच्या तोंडाकडे पाहून ती दुःख पचवण्याचा प्रयत्न करत होती, मात्र या घटनेने तिच्या आयुष्यातील उरलासुरला आधारही हिरावून नेला आहे.

या घटनेनंतर वीरगाव परिसरात सर्वत्र शोककळा पसरली असून दोन्ही चिमुकल्यांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी सुरू आहे. 

हे दोन्ही चिमुकले विहिरीत नेमके पडले कसे? हा घातपाताचा प्रकार आहे का? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित असून पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत. दरम्यान नातेवाईकांनी देखील घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. एकाच कुटुंबातील दोन चिमुकल्यांचा असा अंत झाल्याने वीरगाव सुन्न झाले आहे. सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद खांडबहाले पुढील तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,951
चिमुकल्याचा अंत विरगाव विहिरीत बुडून मृत्यू
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.