Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » श्रीक्षेत्र आवजीनाथ बाबा देवस्थानच्या सुरक्षिततेसाठी आ. सत्यजित तांबे सरसावले; लोहारे-मिरपूर येथे उड्डाणपुलाची मागणी
धार्मिक

श्रीक्षेत्र आवजीनाथ बाबा देवस्थानच्या सुरक्षिततेसाठी आ. सत्यजित तांबे सरसावले; लोहारे-मिरपूर येथे उड्डाणपुलाची मागणी

भाविकांची सुरक्षा आणि तीर्थक्षेत्राचा विकास ही आमची प्राथमिकता आहे. महामार्गामुळे भाविकांना त्रास होऊ नये, यासाठी उड्डाणपुलाचा पाठपुरावा केंद्र स्तरावर करत आहोत. — सत्यजित तांबे, आमदार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/12/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज 

अहिल्यानगर जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लोहारे-मिरपूर येथील श्रीक्षेत्र आवजीनाथ बाबा देवस्थान परिसरात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नांदूर शिंगोटे–कोल्हार राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल उभारण्यात यावा, अशी आग्रही मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे.

या संदर्भात त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पत्राद्वारे आणि दूरध्वनीवरून संपर्क साधून पाठपुरावा सुरू केला आहे.

संगमनेर तालुक्यातील लोहारे येथील आवजीनाथ बाबा मंदिराच्या विकासासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न होत आहेत. गेल्या वर्षी ५० लाख रुपयांच्या निधीतून भक्त निवासाची उभारणी व परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. यामुळे भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, वर्षातून दोन वेळा भरणारी यात्रा आणि दैनंदिन वर्दळ यामुळे हा परिसर गजबजलेला असतो.

अपघाताचा धोका टाळण्यासाठी पाऊल- सध्या नांदूर शिंगोटे ते कोल्हार या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. हा महामार्ग मंदिराच्या अत्यंत जवळून जात असल्याने भविष्यात मंदिर परिसराची जागा अपुरी पडण्याची शक्यता आहे. तसेच, वेगवान वाहतुकीमुळे भाविकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन स्थानिक नागरिक आणि भाविकांनी उड्डाणपुलाची मागणी केली होती.

ना. नितीन गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद- आमदार सत्यजित तांबे यांनी या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे धाव घेतली. चौपदरीकरणाच्या मूळ आराखड्यात सुधारणा करून लोहारे-मिरपूर येथे उड्डाणपुलाचा समावेश करावा, अशी विनंती त्यांनी केली. या मागणीवर गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, यामुळे उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे दिसत आहेत.

या यशस्वी पाठपुराव्याबद्दल लोहारे, मिरपूर, तळेगाव परिसरातील ग्रामस्थांनी लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांचे आभार मानले आहेत.

भाविकांची सुरक्षा आणि तीर्थक्षेत्राचा विकास ही आमची प्राथमिकता आहे. महामार्गामुळे भाविकांना त्रास होऊ नये, यासाठी उड्डाणपुलाचा पाठपुरावा केंद्र स्तरावर करत आहोत. — सत्यजित तांबे, आमदार. 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,007
आवजीनाथ बाबा देवस्थान उड्डाणपूल सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – समग्र शिक्षा योजना सन २०२६-२७ अंतर्गत संगमनेर विधानसभा…

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.