Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » प्रशासक राज संपले! डॉ. मैथिलीताई तांबे आणि टीमचा ‘ऑन ड्युटी’ श्रीगणेशा, शनिवारी स्वीकारणार पदभार; संगमनेर पालिकेत दुर्गाताईंनंतर आता ‘मैथिलीताई पर्व’ सुरू
पत्रकारिता

प्रशासक राज संपले! डॉ. मैथिलीताई तांबे आणि टीमचा ‘ऑन ड्युटी’ श्रीगणेशा, शनिवारी स्वीकारणार पदभार; संगमनेर पालिकेत दुर्गाताईंनंतर आता ‘मैथिलीताई पर्व’ सुरू

शनिवारी होणाऱ्या पदग्रहण सोहळ्यासाठी नगराध्यक्षांच्या दालनाची स्वच्छता, रंगरंगोटी आणि दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. संगमनेर शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी डॉ. मैथिलीताई तांबे यांची टीम आता पूर्णपणे सज्ज झाली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/12/2025Updated:31/12/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर नगर परिषदेच्या इतिहासात एक नवे सुवर्णपान ओढले जात आहे. गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेला ‘प्रशासक काळ’ आता संपुष्टात येणार असून, नववर्षाच्या पहिल्याच शनिवारी (३ जानेवारी) नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे आणि त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक आपल्या पदाचा अधिकृत कार्यभार स्वीकारणार आहेत. या सोहळ्यासाठी संगमनेर पालिकेमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण असून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.
२१ डिसेंबर रोजी पार पडलेल्या मतमोजणीत आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखालील ‘संगमनेर सेवा समिती’ने विरोधकांची पालिकेतील सत्तेची सर्व स्वप्ने उद्ध्वस्त करत ऐतिहासिक विजय नोंदवला. डॉ. मैथिलीताई तांबे यांनी केवळ विजयच मिळवला नाही, तर संपूर्ण राज्यात सर्वाधिक मताधिक्य मिळवणाऱ्या नगराध्यक्षा होण्याचा मानही पटकावला. केंद्रात आणि राज्यात सत्ता असलेल्या भाजपला या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही, तर महायुतीतील शिवसेनेला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. या निकालाने तांबे-थोरात गटाचे संगमनेरवरील वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
गेल्या चार वर्षांपासून पालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती असल्याने धोरणात्मक निर्णयाअभावी अनेक विकासकामे प्रलंबित होती. आता लोकनियुक्त कारभारी सत्तेवर येत असल्याने शहराच्या रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. शनिवारी होणाऱ्या पदग्रहण सोहळ्यासाठी नगराध्यक्षांच्या दालनाची स्वच्छता, रंगरंगोटी आणि दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. संगमनेर शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी डॉ. मैथिलीताई तांबे यांची टीम आता पूर्णपणे सज्ज झाली आहे.
परंपरेचा विजय आणि सत्यजित तांबे यांचा ‘मास्टरस्ट्रोक’ – १९९०-९१ पासून डॉ. सुधीर तांबे यांनी विजयाची जी परंपरा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सुरू केली होती, ती परंपरा आमदार सत्यजित तांबे यांनी ‘सेवा समिती’च्या माध्यमातून अधिक प्रबळ केली आहे. ३१ पैकी २८ जागा जिंकून सेवा समितीने निर्विवाद सत्ता काबीज केली आहे. आमदार तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह पडद्याआडून अनेकांनी निवडणुकीपूर्वी आखलेली रणनीती आणि मतदारांशी साधलेला संवाद हाच या विजयाचा मुख्य आधार ठरला आहे.
जिल्ह्याचे लक्ष सोहळ्याकडे- नववर्षाच्या सुरुवातीलाच होणारा हा पदग्रहण सोहळा केवळ संगमनेरसाठीच नाही, तर संपूर्ण जिल्ह्यासाठी चर्चेचा विषय ठरला आहे. या सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहण्याची शक्यता असून, या निमित्ताने संगमनेरमध्ये मोठे शक्तिप्रदर्शनही पाहायला मिळू शकते. लोकशाहीचा हा नवा अध्याय संगमनेरच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणार, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
चार वर्षानंतर नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींसाठी पालिकेची दार उघडणार! – डिसेंबर २०२१ मध्ये पालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतर तब्बल चार वर्षांनी पुन्हा एकदा पालिकेमध्ये नगराध्यक्ष-नगरसेवकांचे राज येणार आहे. यावेळी सभागृहात जुन्या चेहरा सोबत अनेक चेहरे नवीन दिसणार आहेत. नगराध्यक्ष म्हणून काम करताना गेल्या काही वर्षात दुर्गाताई तांबे यांनी पालिकेच्या कारभाराला मोठी चालना दिली होती. स्वच्छ सुंदर संगमनेरच्या बाबतीत त्यांनी घेतलेल्या निर्णयाची कालांतराने राज्य पातळीवर देखील अंमलबजावणी करण्यात आली. स्वच्छ शहरांमध्ये तांबे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेने कोट्यावधी रुपयांची बक्षिसे देखील मिळविली आहे. आता दुर्गाताई तांबे यांच्या सुनबाई डॉ. मैथिलीताई तांबे नगराध्यक्षांच्या खुर्चीवर विराजमान होणार असल्याने विकास कामांच्या बाबतीत ‘सासू वरचढ सून’ याची प्रचिती आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. मैथिलीताई तांबे यांच्या माध्यमातून संगमनेरकरांना अनुभवण्यास मिळणार असल्याचे बोलले जाते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,208
पदभार मैथिली तांबे संगमनेर नगर परिषद
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar17/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अवघ्या १५०० लिटर दुधापासून सुरू झालेला संगमनेर तालुका सहकारी…

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.