Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नगरसेवकांचे ‘प्रगतीपुस्तक’ आता जनतेच्या दारी; संगमनेरमध्ये पारदर्शकतेचा नवा अध्याय!
राजकारण

नगरसेवकांचे ‘प्रगतीपुस्तक’ आता जनतेच्या दारी; संगमनेरमध्ये पारदर्शकतेचा नवा अध्याय!

बेशिस्त आणि अमली पदार्थांविरोधात 'ॲक्शन प्लॅन' शहराच्या सुरक्षेबाबत बोलताना त्यांनी प्रशासनाला कडक सूचना दिल्या. शहरातील बेशिस्त पार्किंग आणि अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी प्रशासनाने प्रभावी पावले उचलावीत. प्रसंगी काही कटू निर्णय घ्यावे लागले तरी चालतील, मात्र शहराचे आरोग्य बिघडू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 
लोकशाहीत नागरिकांना जसे मूलभूत अधिकार आहेत, तसेच काही कर्तव्येही आहेत. संगमनेरच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ लोकप्रतिनिधी नव्हे, तर जनतेचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. पारदर्शकता वाढवण्यासाठी आता प्रत्येक नगरसेवकाचे काम आणि त्याचे मूल्यमापन थेट नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवले जाईल, अशी महत्त्वाची घोषणा आमदार सत्यजित तांबे यांनी केली.
संगमनेरच्या नूतन नगराध्यक्ष डॉ मैथिली तांबे आणि नूतन नगरसेवकांनी शनिवारी आपल्या पदाचा पदभार हाती घेतला, यावेळी तांबे बोलत होते. राज्याचे माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात, दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, उद्योजक राजेश मालपाणी मनीषा मालपाणी गिरीश मालपाणी आदी यावेळी उपस्थित होते.
नगरपालिकेच्या कामकाजात डिजिटलायझेशन आणि उत्तरदायित्व निर्माण करण्यावर भर देताना आ. तांबे म्हणाले की, इथून पुढे नगरपालिकेचे ऑडिट आणि बॅलन्स शीट अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केले जाईल. जेणेकरून जनतेला शहराच्या आर्थिक स्थितीची खरी माहिती मिळेल.
यापुढील काळात नागरिकांना जन्म-मृत्यूचे दाखले घरपोच दिले जाणार आहे. तसेच नगरपालिकेच्या कामकाजामध्ये पारदर्शकता आणली जाणार असून यापुढील काळात नगरपरिषदेचा प्रत्येक महत्त्वाचा कागद हा पालिकेच्या वेबसाईटवर असेल. याशिवाय उपनगरांमध्ये दोन ठिकाणी क्षेत्रीय कार्यालयाची सुरुवात केली जाणार आहे त्यामुळे नागरिकांना पालिकेत येण्याचा ताण वाचेल. शास्त्री माफीसाठी सुरू करण्यात आलेल्या अभय योजनेचा देखील लाभ घेण्याचे आवाहन तांबे यांनी यावेळी केले.
निवडणूक काळात काही लोकप्रतिनिधींनी अपुऱ्या माहितीच्या आधारे विधाने केल्याचा समाचार घेत आ. तांबे यांनी पालिकेच्या तिजोरीचे गणित मांडले. नगरपालिकेचे उत्पन्न केवळ १५ कोटी रुपये असताना खर्च १६५ कोटी रुपयांच्या घरात आहे. उर्वरित १५० कोटी रुपये हे शासनाच्या विविध योजनांतून खेचून आणावे लागतात, हे वस्तुस्थिती आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
शहराच्या सुरक्षेबाबत बोलताना त्यांनी प्रशासनाला कडक सूचना दिल्या. शहरातील बेशिस्त पार्किंग आणि अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी प्रशासनाने प्रभावी पावले उचलावीत. प्रसंगी काही कटू निर्णय घ्यावे लागले तरी चालतील, मात्र शहराचे आरोग्य बिघडू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. तसेच प्रभाग समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या सहकार्याने विकासकामे मार्गी लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘संगमनेर पॅटर्न’ राज्यासाठी दिशादर्शक – संगमनेरमधील सेवा समितीचे स्वच्छता अभियान सोशल मीडियावर गाजले असून, राज्यासाठी ते एक आदर्श मॉडेल ठरले आहे. येथील चांगल्या उपक्रमांचे अनुकरण आज महाराष्ट्र करत आहे. राज्यातील सर्वात आदर्श नगरपालिका म्हणून संगमनेरचा नावलौकिक कायम राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा विश्वास तांबे यांनी व्यक्त केला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 733
नगराध्यक्ष पदग्रहण बाळासाहेब थोरात मैथिली तांबे सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: आगामी गणेशोत्सव भव्य, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार…

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.