Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये विकासाचा ‘हाय व्होल्टेज करंट’; खोट्या केसेस करणाऱ्यांना जनता घरी बसवणार – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
राजकारण

संगमनेरमध्ये विकासाचा ‘हाय व्होल्टेज करंट’; खोट्या केसेस करणाऱ्यांना जनता घरी बसवणार – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात यांनी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे रणशिंग फुंकले. त्यांनी शरद नाना थोरात यांची जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/01/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर तालुक्याने नेहमीच प्रेमाची आणि विश्वासाची साथ दिली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत जो उत्साह दिसला, तो केवळ विजय नसून विकासाचा ‘हाय व्होल्टेज करंट’ आहे. हाच करंट आता चुकीचं बोलणाऱ्यांना आणि सत्तेच्या जोरावर खोट्या केसेस करणाऱ्यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही, अशा कडक शब्दांत माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांवर घणाघाती हल्ला चढवला.

पिंपरणे (संगमनेर) येथे आयोजित भव्य शेतकरी मेळावा आणि संगमनेर नगर परिषदेच्या नूतन लोकप्रतिनिधींच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आरपीआयचे नेते सुधाकरराव रोहम होते. या मेळाव्याला व्यासपीठावर संगमनेरच्या नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे, युवा नेत्या डॉ. जयश्रीताई थोरात, रणजीतसिंह देशमुख, शरद नाना थोरात, शंकरराव खेमनर, कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग घुले, अजय फटांगरे, साखर संघाचे राज्य उपाध्यक्ष बाबा ओहोळ यांच्यासह परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात थोरातांनी तालुक्यातील राजकीय दडपशाही, वाळू तस्करी आणि प्रलंबित विकासकामांवरून सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढले.

४० वर्षांच्या हिशोबावरून विरोधकांना फटकारले- विरोधकांकडून वारंवार विचारल्या जाणाऱ्या “४० वर्षांत काय केले?” या प्रश्नाला थोरातांनी सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले, सामान्य माणसाच्या जीवनात आलेली समृद्धी आणि झालेलं परिवर्तन हेच माझ्या कामाचं उत्तर आहे. ज्यांना साधा नगर-मनमाड रस्ता दुरुस्त करता येत नाही, त्यांनी आम्हाला ४० वर्षांचा हिशोब विचारू नये. तालुक्यातील शैक्षणिक संस्था, सोसायट्या आणि उभ्या राहिलेल्या वास्तू हे आमच्या कष्टाचं फळ आहे.

वाळू तस्करी आणि ड्रग्ज प्रकरणावरून चिंता- तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेवर भाष्य करताना थोरात यांनी गंभीर आरोप केले. काही मंडळी केवळ वाळूचा धंदा करण्यासाठी पक्ष सोडून गेल्याची टीका त्यांनी केली. नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असून तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे ढकलली जात आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडे ड्रग्ज आणि अमली गोळ्या सापडल्याच्या घटना धक्कादायक आहेत. बिगर कष्टाचा पैसा आणि व्यसनं तुमच्या घराचं वाटोळं करतील, असा इशारा त्यांनी पालकांना दिला.

निळवंडे आणि रेल्वे: विकासाची नवी स्वप्ने- निळवंडे धरणाचे पाणी शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणे हे आपले मुख्य उद्दिष्ट असल्याचा त्यांनी पुन्हा एकदा पुनरुच्चार केला. “मी पाणी शिजवून वाढून ठेवलं, पण जेवायच्या वेळी मी आमदार नव्हतो याचं दुःख नाही; मात्र ते पाणी वंचित शेतकऱ्यांना मिळालेच पाहिजे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच, नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प हा तालुक्याच्या प्रगतीसाठी निळवंडे इतकाच महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

दहशतवाद आणि खोट्या केसेसचा निषेध- सध्या तालुक्यात कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने खोट्या केसेस टाकण्याचे सत्र सुरू असल्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. झाडाच्या फांद्या तोडल्या तरी गुन्हे दाखल केले जात आहेत. आम्ही मंत्री असताना कधीही कोणावर सूडबुद्धीने कारवाई केली नाही, पण सध्या चाललेला हा प्रकार लोकशाहीला घातक आहे, असे ते म्हणाले.

निवडणुकीचे रणशिंग: शरद नाना थोरात यांची उमेदवारी जाहीर- याच मेळाव्याच्या व्यासपीठावरून बाळासाहेब थोरात यांनी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे रणशिंग फुंकले. त्यांनी शरद नाना थोरात यांची जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. संगमनेरचा स्वाभिमान जपण्यासाठी आणि तालुक्याला ‘गुलामगिरी’तून वाचवण्यासाठी सर्वांनी एकजूट होण्याचे आवाहन त्यांनी केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 581
बाळासाहेब थोरात शेतकरी मेळावा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar10/09/20260

annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत…

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.