Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बदलत्या माध्यमांकडे सकारात्मकतेने पहा, पत्रकारांनी ‘लोकाभिमुख’ व्हावे: ज्येष्ठ पत्रकार शीतल पवार
महाराष्ट्र संवाद विशेष

बदलत्या माध्यमांकडे सकारात्मकतेने पहा, पत्रकारांनी ‘लोकाभिमुख’ व्हावे: ज्येष्ठ पत्रकार शीतल पवार

यावेळी शीतल पवार यांनी धुळे सारख्या छोट्या गावातून सुरू झालेला आणि पुण्यापर्यंत पोहोचलेला आपला पत्रकारितेचा प्रवास उलगडला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
अकोले (प्रतिनिधी):
माध्यमांच्या बदलत्या स्वरूपाबाबत आपण प्रचंड सकारात्मक व आशावादी असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार शीतल पवार यांनी अकोले येथे केले. सध्या माध्यम क्षेत्रात मोठी रचना आणि व्यवस्थापन बदलत आहे, ज्यामुळे काही आव्हाने निर्माण झाली आहेत. मात्र, या बदलांतून संधी शोधणारा माणूस हा पत्रकारच असून तो उत्तम पद्धतीने या बदलांशी जुळवून घेत असल्याचे त्यांनी नमूद केले.
पत्रकार दिनानिमित्त अकोले नगर पंचायत व अकोले पत्रकार यांच्या वतीने शीतल पवार यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, सोशल मीडियावर मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे व्यक्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. वृत्तपत्रांमध्ये जागेची मर्यादा असल्याने आता या व्यक्त होणाऱ्या विचारांना डिजिटल मीडियावर जागा द्यावी लागणार आहे. आज प्रत्यक्ष वर्तमानपत्र हातात घेऊन वाचणाऱ्यांची संख्या कमी वाटत असली, तरी ई-पेपर वाचणाऱ्यांची संख्या काही लाखांच्या घरात पोहोचली आहे, ही समाधानाची बाब आहे.
या बदलांच्या काळात पत्रकारांनी आता आपले लिखाण अधिक वेगळ्या आणि कल्पक पद्धतीने करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. विशेषतः ग्रामीण पत्रकारांच्या बाबतीत हा वेगळेपणा दिसून येतो. आपण लोकांसाठी काय वेगळे देतो आणि आपले माध्यम त्यांच्यापर्यंत कसे पोहोचवतो, याला भविष्यात मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे. हे बदल अत्यंत वेगाने होत असून, येत्या एक-दोन वर्षांत माध्यम क्षेत्राचे पूर्णतः बदललेले रूप आपल्याला अनुभवायला मिळेल, त्यामुळे पत्रकारांनी अधिकाधिक लोकाभिमुख होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाला नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, उपनगराध्यक्ष शरदराव नवले, नगरसेवक विजय पवार, मुख्याधिकारी धनश्री पवार, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश टाकळकर, श्रीनिवास रेणूकदास, अमोल वैद्य, विद्याचंद्र सातपुते, राजेंद्र मालुंजकर, दिनेश जोरवर, आकाश भालेराव, प्रदीप कदम, संकेत आवारी, मनसे तालुकाध्यक्ष दत्ता नवले, रणजित शिंदे व नगरपंचायतचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी शीतल पवार यांनी धुळे सारख्या छोट्या गावातून सुरू झालेला आणि पुण्यापर्यंत पोहोचलेला आपला पत्रकारितेचा प्रवास उलगडला. उपस्थित पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी मनमोकळी उत्तरे दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांनी केले, तर नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 496
अकोले अमोल वैद्य पत्रकार दिन शितल पवार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे…

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.