Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » थांबवा ती गुन्हेगारी! संगमनेरच्या शांततेला तडे; अमली पदार्थांची तस्करी आणि गुन्हेगारीविरोधात दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली महिलांचे पोलीस प्रशासनाला साकडे
आंदोलन

थांबवा ती गुन्हेगारी! संगमनेरच्या शांततेला तडे; अमली पदार्थांची तस्करी आणि गुन्हेगारीविरोधात दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली महिलांचे पोलीस प्रशासनाला साकडे

संगमनेरमध्ये सध्या अवैध अमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली असून, यामुळे शालेय व महाविद्यालयीन तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या आहारी जात आहे. तसेच, शहरात चोरी, मारहाण आणि भरदिवसा दहशत निर्माण करणाऱ्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे महिला आणि सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी-

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली ‘विकसित आणि वैभवशाली’ शहर म्हणून ओळख असलेल्या संगमनेरला गेल्या वर्षभरापासून गुन्हेगारीचे ग्रहण लागले आहे. शहरातील वाढती अमली पदार्थांची तस्करी, दहशत आणि चोऱ्यांच्या घटनांमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, ही गुन्हेगारी तातडीने थांबवावी, या मागणीसाठी शहरातील महिला पदाधिकारी कमालीच्या आक्रमक झाल्या आहेत. या संदर्भात आज नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे आणि माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासनाला तीव्र भावनांचे निवेदन देण्यात आले.

शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात महिलांनी शहरातील विदारक परिस्थिती मांडली आहे. पोलीस निरीक्षक बारवकर यांनी महिलांच्या भावना जाणून घेत, या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.

संगमनेरमध्ये सध्या अवैध अमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली असून, यामुळे शालेय व महाविद्यालयीन तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या आहारी जात आहे. तसेच, शहरात चोरी, मारहाण आणि भरदिवसा दहशत निर्माण करणाऱ्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे महिला आणि सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

शहरातील पोलीस गस्त (पेट्रोलिंग) तातडीने वाढवावी. संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तींवर कडक पाळत ठेवावी. अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या माफियांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. चोरी आणि दहशतीच्या घटनांना पायबंद घालून गुन्हेगारांचा बंदोबस्त करावा आदी प्रमुख मागण्या या रणरागिणींनी केल्या आहे.

हे संगमनेरचे दुर्दैव – यावेळी बोलताना माजी नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्याची राज्यात एक वेगळी प्रतिष्ठा आहे. मात्र, अलीकडच्या काळात शहरात ज्या प्रकारे गुन्हेगारी आणि ड्रग्जचा शिरकाव झाला आहे, ते अत्यंत दुर्दैवी आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी आता अधिक कठोर होण्याची गरज आहे. दोषींना पाठीशी न घालता त्यांच्यावर तातडीने कारवाई व्हावी.

यावेळी नगरसेविका दिपाली पंचारिया, सरोजिनी पगडाल, वनिता गाडे, नंदा गरुडकर, अनुराधा सातपुते, सीमा खटाटे, विजया गुंजाळ यांच्यासह मंगल कासार, सुषमा भालेराव, मीना सोसे, उज्वला पगार, मुमताज सौदागर, शोभा तुपे, मोहिनी बनसोडे, वैशाली कोल्हे, सोनिया थोरात, शिवानी गाडे, सुविधा आरसिद्ध, सुनीता कांदळकर, वर्षा भोंडे, मनीषा शिंदे, ज्योती दारोळे, कीर्ती मुळे, दीपा कलंत्री, मीनल निऱ्हाळी, कल्पना कुटे, स्नेहलता एखंडे, कोमल दायमा आदींसह शेकडो महिला उपस्थित होत्या.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 798
गुन्हेगारी दुर्गाताई तांबे निवेदन समीर बारवकर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026

प्रत्येक एफआयआर माझ्यासाठी एखाद्या मेडल प्रमाणे; ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही- राहुल गांधी

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
नैसर्गिक आपत्ती

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सध्या दुष्काळाची अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली असून…

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.