Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026

हरेगाव येथे १९ सप्टेंबरला ‘ख्रिस्ती हक्क संघर्ष परिषद’; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

15/09/2026

मंगळवार, १५ सप्टेंबर रोजीचे राशीभविष्य… जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना मोठा झटका; अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या ९ वरून थेट ४ वर
प्रशासन

उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना मोठा झटका; अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या ९ वरून थेट ४ वर

२०१६ मध्ये सुरू झालेल्या उज्ज्वला योजनेअंतर्गत सुरुवातीला लाभार्थ्यांना दरवर्षी १४.२ किलोचे १२ अनुदानित सिलिंडर मिळत होते. मागील वर्षी हा कोटा ९ सिलिंडरपर्यंत कमी करण्यात आला होता, तो आता थेट ४ वर आणण्यात आला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

नवी दिल्ली:
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठीच्या अनुदानित गॅस सिलिंडरच्या संख्येत मोठी कपात केली आहे.
सरकारच्या निर्णयानुसार आता लाभार्थ्यांना प्रतिवर्ष मिळणाऱ्या ९ सिलिंडरऐवजी केवळ ४ सिलिंडरच अनुदानित दराने मिळतील. या चार सिलिंडरसाठी लाभार्थ्यांना ६४२ रुपये मोजावे लागणार असून, त्यापुढील उर्वरित सिलिंडर खरेदीसाठी त्यांना अधिकची बाजारभावाप्रमाणे रक्कम द्यावी लागणार आहे.
मध्यपूर्वेतील तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर कमालीचे भडकले असून गॅस सिलिंडरच्या अनुदानावरील खर्चात मोठी वाढ झाली आहे. वाढता खर्च आणि तोटा लक्षात घेता सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यातच एलपीजी गॅसचे उत्पादन करणाऱ्या सरकारी कंपन्यांना अद्यापही प्रत्येक सिलिंडरमागे सुमारे ७०० रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.
२०१६ मध्ये सुरू झालेल्या उज्ज्वला योजनेअंतर्गत सुरुवातीला लाभार्थ्यांना दरवर्षी १४.२ किलोचे १२ अनुदानित सिलिंडर मिळत होते. मागील वर्षी हा कोटा ९ सिलिंडरपर्यंत कमी करण्यात आला होता, तो आता थेट ४ वर आणण्यात आला आहे.
दुसरीकडे, ७ जून रोजी घरगुती वापराच्या १४.२ किलो गॅस सिलिंडरच्या दरात २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे दिल्ली आणि मुंबईत हा दर अनुक्रमे ९४२ आणि ९४१ रुपयांवर पोहोचला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या पाठोपाठ आता गॅस देखील महागल्याने सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसत आहे. घरगुती गॅससह व्यावसायिक वापराचा सिलिंडरही महागला असून, १ जून रोजी व्यावसायिक गॅसच्या दरात ४२ रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या पाच महिन्यांत १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरचे दर तब्बल दुप्पट झाले आहेत. जानेवारीत १५८० रुपये असणारा हा दर आता ३ हजार ११३ रुपये ५० पैशांवर पोहोचल्याने हॉटेल आणि खाद्यपदार्थांचे दर वाढले असून सर्वसामान्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 361
उज्वला गॅस योजना गॅस सिलेंडर दरवाढ सिलेंडर कपात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

14/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
अपघात

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar मोहसीन शेख | महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरात…

हरेगाव येथे १९ सप्टेंबरला ‘ख्रिस्ती हक्क संघर्ष परिषद’; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

15/09/2026

मंगळवार, १५ सप्टेंबर रोजीचे राशीभविष्य… जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

15/09/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.