Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सावधान! संगमनेर पोलिसांना चोरांचे वावडे; तुमची सुरक्षा आता तुमच्याच हाती! संगमनेरात मंगळसूत्र चोरी आणि घरफोडीचा उच्छाद!
गुन्हेगारी

सावधान! संगमनेर पोलिसांना चोरांचे वावडे; तुमची सुरक्षा आता तुमच्याच हाती! संगमनेरात मंगळसूत्र चोरी आणि घरफोडीचा उच्छाद!

एकीकडे सर्वसामान्यांच्या कष्टाची कमाई चोरटे लुटत असताना, दुसरीकडे पोलीस यंत्रणा मात्र 'सुस्त' असल्याचे चित्र आहे. स्थानिक शहर पोलीस, पोलीस उपाधीक्षक कार्यालय, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय आणि एलसीबी (LCB) यांसारख्या मोठ्या यंत्रणा असतानाही गुन्हेगारीवर नियंत्रण का नाही? असा सवाल विचारला जात आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर (प्रतिनिधी):
संगमनेर शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, सामान्य नागरिकांच्या मालमत्तेची आणि सुरक्षेची पुरती वाट लागली आहे. भरदिवसा महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचले जात असून, बंद घरांचे कडी-कोयंडे तोडून रोकड आणि दागिने लंपास केले जात आहेत. या मालिका गुन्ह्यांमुळे संगमनेरमध्ये ‘कायद्याचे राज्य’ उरले आहे की ‘गुन्हेगारांचे वर्चस्व’ वाढले आहे, असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.
पहिली घटना शहरातील गजबजलेल्या बी.एड. कॉलेज रोडवरील ईदगाह मैदानाच्या गेटजवळ घडली. अनिता संतोष पितळे (रा. सह्याद्री कॉलेजच्या मागे) या आपल्या किराणा दुकानाकडे जात असताना, दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जोरात हिसका मारून चोरून नेले. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाकडे तपास करत आहेत.
दुसरी घटना नवीन नगर रस्त्यावर घडली आहे. येथील एका अपार्टमेंटमधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. फिर्यादी आपल्या पत्नीसह कामानिमित्त बाहेर गेले असताना, दिवसाढवळ्या चोरट्यांनी घरफोडीचे धाडस केले. या प्रकरणाचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सातपुते यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
पोलीस यंत्रणा काय करतेय? ‘आर्थिक’ हितसंबंधांची चर्चा!- शहरात चोरीचे सत्र केवळ रात्रीच नव्हे, तर आता दिवसाढवळ्या सुरू आहे. एकीकडे सर्वसामान्यांच्या कष्टाची कमाई चोरटे लुटत असताना, दुसरीकडे पोलीस यंत्रणा मात्र ‘सुस्त’ असल्याचे चित्र आहे. स्थानिक शहर पोलीस, पोलीस उपाधीक्षक कार्यालय, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय आणि एलसीबी (LCB) यांसारख्या मोठ्या यंत्रणा असतानाही गुन्हेगारीवर नियंत्रण का नाही? असा सवाल विचारला जात आहे.
शहरात फोफावलेले अवैध धंदे हेच गुन्हेगारीचे मुख्य केंद्र ठरत असून, या धंद्यांना पोलीस यंत्रणेचे छुपे ‘अभय’ तर मिळत नाही ना, अशी शंका नागरिक व्यक्त करत आहेत. पोलीस यंत्रणा तपासापेक्षा ‘आर्थिक’ तडजोडींमध्येच अधिक मग्न असल्याच्या चर्चांनी आता शहरात जोर धरला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 440
गुन्हेगारी चैन स्नॅचिंग
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

08/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आर्थिक

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सोशल मीडियावरील रिल्स, भ्रामक ट्रेंड आणि ऑनलाइन चर्चांच्या…

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘एक विद्यार्थी, एक बेंच’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; आठवडाभरात ६८ हजारांच्या लोकसहभागातून ४० बेंचचे लोकार्पण

08/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.