संगमनेर: प्रतिनिधी
संगमनेर शहराची जीवनवाहिनी असलेल्या प्रवरा-म्हाळुंगी नदीच्या पात्रातून सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपशावर महसूल विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे धडक कारवाई केली. शांतीघाट परिसरात वाळू तस्करी सुरू असताना पथकाने छापा टाकला. यावेळी पळून जाणाऱ्या तस्करांचा थरारक पाठलाग करत दोघांना रंगेहात पकडण्यात आले, तर अन्य आठ जण उसाच्या शेतातून निसटले. या कारवाईत वाळूसह रिक्षा जप्त करण्यात आली असून १० जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
संगमनेरमधील शांतीघाट परिसरात रिक्षाच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा व वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती तहसीलदार धीरज मांजरे यांना मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत तहसीलदारांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार महसूल आणि पोलीस विभागाचे एक विशेष पथक तयार करण्यात आले. पथकाने घटनास्थळी धाड टाकताच वाळू माफियांची पळापळ सुरू झाली. पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोणताही विलंब न लावता पळून जाणाऱ्या तस्करांचा पाठलाग सुरू केला. यामध्ये सर्फराज रियाज शेख (रा. रहेमत नगर, संगमनेर) आणि सलीम झहीर शेख (रा. संगमनेर खुर्द) या दोघांना पकडण्यात यश आले. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच इतर आठ ते दहा संशयित आरोपींनी जवळच असलेल्या उसाच्या शेताचा फायदा घेत तिथून पळ काढला.
या धडक कारवाईत पथकाने १,५०० रुपये किमतीची अडीच ब्रास वाळू आणि २५ हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची रिक्षा असा एकूण मुद्देमाल हस्तगत केला आहे. हा सर्व मुद्देमाल सध्या तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आला आहे. ग्राम महसूल अधिकारी जाफर पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई तहसीलदार धीरज मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल अधिकारी सचिन बोरकर, प्रवीण आशुतोष वाकडे, अविष्कार थोरात, वैभव गुंजाळ आणि पोलीस कॉन्स्टेबल खुळे व बेनके यांनी पार पाडली. सध्या पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली फरार आरोपींचा शोध सुरू आहे. महसूल विभागाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
प्रवरा-म्हाळुंगीच्या संगमावर शांती घाटापाशी महसूल-पोलिसांचा थरार; वाळू माफियांचा पाठलाग करून दोघांच्या मुसक्या आवळल्या, आठ जण पसार
दोघांना पकडण्यात यश आले. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच इतर आठ ते दहा संशयित आरोपींनी जवळच असलेल्या उसाच्या शेताचा फायदा घेत तिथून पळ काढला.



संगमनेर: प्रतिनिधी
या धडक कारवाईत पथकाने १,५०० रुपये किमतीची अडीच ब्रास वाळू


