Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचा जाहीर निषेध; भीम कन्या माधवी जाधव यांना पी. जे. रोहम फाउंडेशनचा पाठिंबा
सामाजिक

नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचा जाहीर निषेध; भीम कन्या माधवी जाधव यांना पी. जे. रोहम फाउंडेशनचा पाठिंबा

समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही लोकशाहीची मूल्ये देणाऱ्या घटनाकारांचा विसर पडणे हे देशासाठी अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, २७ जानेवारी – 
भाषणादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख टाळल्याने नाशिकच्या पालकमंत्र्यांची प्रजासत्ताक दिनाची कृती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पालकमंत्र्यांना जाब विचारणाऱ्या भीम कन्या माधवी जाधव यांच्यावर कोणताही अन्याय झाल्यास किंवा प्रशासकीय कारवाईचा प्रयत्न झाल्यास सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा ॲड. किरण रोहम यांनी पी. जे. रोहम फाउंडेशनच्या माध्यमातून दिला आहे.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षात नाशिक येथील शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळल्याने एक मोठा वाद निर्माण झाला आहे. या घटनेचे पडसाद आता संपूर्ण राज्यात उमटत असून, पी. जे. रोहम फाउंडेशन आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांच्या या भूमिकेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. 
विशेषतः, कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहून पालकमंत्र्यांना धाडसाने जाब विचारणाऱ्या रणरागिणी वन कर्मचारी माधवी जाधव यांच्या पाठीशी संपूर्ण संघटना उभी राहिली असून त्यांना जाहीर पाठिंबा दर्शवण्यात आला आहे.
स्वातंत्र्य भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनी आयोजित शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहण पार पडल्यानंतर पालकमंत्र्यांनी उपस्थितांना संबोधित केले. मात्र, ज्या महामानवाने २ वर्षे ११ महिने अहोरात्र कष्ट उपसून देशाला जगातील श्रेष्ठ संविधान दिले, त्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख भाषणात टाळल्याने उपस्थितांमध्ये संतापाची लाट उसळली. 
अशा गंभीर प्रसंगी आपल्या सरकारी नोकरीची पर्वा न करता, माधवी जाधव यांनी तात्काळ पालकमंत्र्यांना या चुकीबद्दल जाब विचारला आणि जाहीर माफीची मागणी केली. प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र दिवशी संविधान निर्मात्यांना यथोचित मानवंदना देणे अपेक्षित असताना, पालकमंत्र्यांनी ज्या पद्धतीने भाषण केले ते अत्यंत चुकीचे आणि अपमानस्पद असल्याचा आरोप सामाजिक वर्तुळातून होत आहे.
या संदर्भात माजी आमदार पी. जे. रोहम फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. किरण सुधाकर रोहम यांनी आपली आक्रमक भूमिका मांडली आहे. माधवी जाधव यांनी दाखवलेल्या हिमतीचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे सांगत त्यांनी जाधव यांना पूर्णपणे समर्थन जाहीर केले आहे. समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही लोकशाहीची मूल्ये देणाऱ्या घटनाकारांचा विसर पडणे हे देशासाठी अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले.
या निषेध मोहिमेत आणि पाठिंबा दर्शवण्यात सुरेशराव देठे, केशवराव दिघे, किरण भालेराव, नानाभाऊ वाघमारे, प्रा. बाळासाहेब वाघमारे, ज्येष्ठ रिपाई नेते सुखदेव भालेराव, रावसाहेब जगताप, रमेश रुपवते, अमोल जगताप, अशोक बनसोडे, कल्पना फापाळे, भास्करराव फापाळे, जयवंतराव आढाव, बाळासाहेब आढाव आणि बाळासाहेब जाधव यांसह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला आहे. या घटनेमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात पालकमंत्र्यांविरुद्ध रोष वाढत असून आगामी काळात हे प्रकरण अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 491
पाठिंबा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शासकीय कामांसाठी आणि सार्वजनिक सोयी-सुविधांसाठी राखीव असलेल्या जमिनीवर भूमाफियांनी आणि अतिक्रमणधारकांनी…

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.