Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

16/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राष्ट्र सेवा दल संगमनेरच्या कार्याध्यक्षपदी अनुराधा आहेर, सचिवपदी रवी दिवे तर खजिनदारपदी विश्वनाथ भुजबळ
सामाजिक

राष्ट्र सेवा दल संगमनेरच्या कार्याध्यक्षपदी अनुराधा आहेर, सचिवपदी रवी दिवे तर खजिनदारपदी विश्वनाथ भुजबळ

यावेळी तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राम चन्ना यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच छात्र भारती संघटनेच्या राज्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अनिकेत घुले यांचाही राष्ट्र सेवा दलाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/02/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 

राष्ट्र सेवा दल संगमनेरच्या कार्याध्यक्षपदी अनुराधा आहेर, सचिवपदी रवी दिवे तर खजिनदारपदी विश्वनाथ भुजबळ यांची निवड करण्यात आली. 

स्वातंत्र्यसैनिक भास्करराव दुर्वे नाना स्मारक येथे रविवारी तालुका अध्यक्ष राम चन्ना यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्र सेवा दल संगमनेर केंद्राच्या विशेष बैठकीत नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. चन्ना यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत संघटनेच्या भविष्यातील वाटचालीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीच्या सुरुवातीला राष्ट्र सेवा दलाची विचारधारा, समाजप्रबोधन, युवक संघटन आणि संविधान मूल्यांच्या संरक्षणासह लोकशाही बळकटीकरणावर भर देण्यात आला. आगामी काळात संगमनेर तालुक्यात संघटनेचा विस्तार करून सामाजिक, शैक्षणिक आणि लोकजागृतीचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. 

यावेळी तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राम चन्ना यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच छात्र भारती संघटनेच्या राज्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अनिकेत घुले यांचाही राष्ट्र सेवा दलाच्या वतीने सन्मान करण्यात आला.

या महत्त्वपूर्ण बैठकीला हिरालाल पगडाल, राजा अवसक, सिताराम राऊत, समीर लामखडे, संदीप काकड, रजत अवसक, उज्वला कर्डिले, प्रा. बेनके, बंटी साळवे, नईम इनामदार, अर्जुन वाळके आणि श्रीनिवास पगडाल सर यांच्यासह राष्ट्र सेवा दलाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध क्षेत्रांतील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटनेच्या ध्येयधोरणांशी निष्ठा राखून कार्य करण्याची ग्वाही देत आणि कार्यविस्ताराचा संकल्प करून या बैठकीचा समारोप करण्यात आला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 520
निवडी राष्ट्र सेवा दल
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

16/09/2026

हरेगाव येथे १९ सप्टेंबरला ‘ख्रिस्ती हक्क संघर्ष परिषद’; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

15/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिबिर

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

By Annant Ppangarkar16/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – धावपळीच्या आधुनिक जीवनशैलीत अचानक निर्माण होणाऱ्या वैद्यकीय आणीबाणीच्या…

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

16/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.