Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गुंगीकारक गोळ्यांच्या विक्रीचा पर्दाफाश; महिलेला अटक
गुन्हेगारी

गुंगीकारक गोळ्यांच्या विक्रीचा पर्दाफाश; महिलेला अटक

या संपूर्ण कारवाईचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले असून, जप्त केलेला मुद्देमाल पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

श्रीरामपूर, महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

शहरात विनापरवाना आणि नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गुंगीकारक गोळ्यांची विक्री करणाऱ्या एका महिलेवर पोलिसांनी धाडसी कारवाई केली आहे. श्रीरामपूरच्या इराणी गल्ली भागात राहणारी झैनब जाफर इराणी (वय २४) ही महिला कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय नायट्रोझेपम या गुंगीकारक गोळ्यांची विक्री करत असताना रंगेहात पकडली गेली. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेला अटक करण्यात आली आहे.

या कारवाईची पार्श्वभूमी अशी की, श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, वार्ड नं १ मधील इराणी गल्लीत एक महिला नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधी गोळ्यांची विक्री करत आहे. या माहितीची गांभीर्याने दखल घेत अप्पर पोलीस अधीक्षकांनी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बेबी शिंदे आणि त्यांच्या पथकाला तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, पोलीस पथकाने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नितीन देशमुख यांच्या मदतीने स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा तयार केला. यामध्ये महिला पोलिसांचाही समावेश करण्यात आला होता.

हे पथक दोन पंचांसह खाजगी वाहनाने दुपारी ३ वाजेच्या सुमारास इराणी गल्लीत पोहोचले. तिथे संशयित महिलेच्या घराची खात्री केल्यानंतर पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घराची झडती घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला महिलेची अंगझडती घेण्यात आली, मात्र तिथे काही आढळले नाही. त्यानंतर घराच्या दरवाज्याच्या आतील बाजूस असलेल्या एका प्लास्टिक पिशवीची तपासणी केली असता, त्यात औषधी गोळ्यांच्या स्ट्रिप्स मिळून आल्या.

पोलिसांनी या गोळ्यांबाबत विचारपूस केली असता, त्या नायट्रोझेपम (NITRAZEPAM) नावाच्या गुंगीकारक गोळ्या असल्याचे समोर आले. सदर महिलेकडे या गोळ्यांच्या विक्रीचा कोणताही परवाना किंवा डॉक्टरांची चिठ्ठी नव्हती. तिने या गोळ्या विक्रीसाठीच आणल्याचे पोलिसांसमोर कबूल केले. या कारवाईत पोलिसांनी ५८१ रुपये किमतीच्या एकूण ९ पाकिटे गोळ्या जप्त केल्या आहेत.

या संपूर्ण कारवाईचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले असून, जप्त केलेला मुद्देमाल पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आला आहे. आरोपी महिला झैनब जाफर इराणी हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १२३, १२५ आणि २७८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे श्रीरामपूर परिसरातील अवैध औषध विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 715
गुन्हेगारी नशेच्या गोळ्या
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर फेस्टिव्हलमधील दुसरा दिवस गाजवला तो विख्यात संगीतकार ए.आर.रहमान यांच्या…

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.