Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026

आज रविवार, १३ सप्टेंबर— जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये एलसीबीचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! स्थानिक पोलिसांच्या नाकावर टिच्चून सुरू असलेल्या कत्तलखान्यावर कारवाई; ५.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये एलसीबीचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! स्थानिक पोलिसांच्या नाकावर टिच्चून सुरू असलेल्या कत्तलखान्यावर कारवाई; ५.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त

एलसीबीच्या या धाडसी कारवाईने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले असले, तरी स्थानिक प्रशासनाने आपली जबाबदारी झटकल्याचे चित्र या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/02/2026Updated:06/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर:
संगमनेर शहरात अवैध धंद्यांनी अक्षरशः कळस गाठला असून, स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शहरातील जमजम कॉलनी भागात स्थानिक पोलिसांच्या नाकावर टिच्चून सुरू असलेल्या एका मोठ्या गोवंश कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पहाटेच्या सुमारास छापा टाकला.
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पथकाने केलेल्या या कारवाईत ५ लाख ५३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत एकाला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, या कारवाईमुळे शहर पोलिसांचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष आणि कत्तलखाने बंद करण्यात प्रशासनाला आलेले अपयश आता चव्हाट्यावर आले आहे.
६ फेब्रुवारीच्या पहाटे जमजम कॉलनीतील गल्ली क्रमांक ९ मध्ये रक्ताचा सडा पडलेला असताना आणि जनावरांची कत्तल सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिथे धाड टाकली. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींची पळापळ झाली, तरीही पोलिसांनी साहेब मोहीद्दीन कुरेशी (वय २३) याला झडप घालून जेरबंद केले.
या छाप्यात पोलिसांनी ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे १५०० किलो गोमांस, १ लाख रुपये किमतीचे दोन जिवंत गोवंश, इलेक्ट्रिक वजनकाटा आणि धारदार हत्यारे जप्त केली आहेत. या प्रकरणी फरार झालेले आरोपी साहिल उर्फ साद कुरेशी आणि अयान कुरेशी यांचा शोध सुरू आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ आणि महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी शहरातील इतर कोपऱ्यांत सुरू असलेले असे अवैध धंदे कायमस्वरूपी कधी बंद होणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, भरवस्तीत इतक्या मोठ्या प्रमाणावर अवैध कत्तल सुरू असताना स्थानिक शहर पोलिसांना याची कुणकुण कशी लागली नाही? स्थानिक यंत्रणेच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य आहे का? असे संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. अवैध कत्तलखाने बंद करण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचे या कारवाईवरून स्पष्ट होत आहे.
एलसीबीच्या या धाडसी कारवाईने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले असले, तरी स्थानिक प्रशासनाने आपली जबाबदारी झटकल्याचे चित्र या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

📌 हप्तेखोरी की हलगर्जीपणा?

संगमनेर शहराच्या मध्यवस्तीत, नागरी वस्तीत इतक्या मोठ्या प्रमाणावर रक्ताचा सडा पडतो, पण शहर पोलिसांना त्याचा सुगावा लागत नाही, हे न उलगडणारे कोडे आहे. एलसीबीला जे दिसते, ते स्थानिक गुन्हे शोध पथकाला (DB) का दिसत नाही? हा केवळ यंत्रणेचा ढिसाळपणा आहे की यामागे काही ‘अर्थपूर्ण’ लागेबांधे आहेत? वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आता केवळ गुन्हे दाखल करून न थांबता, स्थानिक पोलिसांच्या या ‘आंधळेपणाची’ देखील चौकशी करण्याची वेळ आली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 795
कत्तलखाना कारवाई छापा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरातील प्रभाग क्रमांक ३…

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026

आज रविवार, १३ सप्टेंबर— जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

13/09/2026

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.