Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगरमध्ये रविवारी रंगणार ऐतिहासिक सोहळा; बोल्हेगाव फाटा स्वामी समर्थ केंद्रात २५ हजार भाविकांचे सामूहिक स्वामी चरित्र पारायण

July 23, 2026

आज, गुरुवार २३ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 23, 2026

विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध; सरकारच्या निषेधार्थ मशाल मोर्चात संगमनेरकर एकवटले, रस्त्यावर उतरले; बाळासाहेब थोरातांसह सर्व समविचारी पक्षीयांचा समावेश

July 22, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मान्सून खोळंबला; किमान १५ जूनपर्यंत राज्यात सार्वत्रिक पावसाची शक्यता धूसर, शेतकऱ्यांना घाई न करण्याचे आवाहन
महाराष्ट्र संवाद विशेष

मान्सून खोळंबला; किमान १५ जूनपर्यंत राज्यात सार्वत्रिक पावसाची शक्यता धूसर, शेतकऱ्यांना घाई न करण्याचे आवाहन

हा पाऊस सर्वव्यापी नसल्यामुळे तो पेरणीसाठी पूरक ठरणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJune 7, 2026Updated:June 7, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई: 

मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असला तरी तो अद्याप सर्वदूर सक्रिय झालेला नाही. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, किमान १५ जूनपर्यंत राज्यातील पावसाचा जोर आणि मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात कुठेही समाधानकारक आणि सार्वत्रिक पाऊस पडण्याची चिन्हे दिसत नसून, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे करण्यात आले आहे.

दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये ९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर मात्र पावसाचा जोर ओसरणार आहे. सध्याच्या स्थितीनुसार १५ जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन विखुरलेल्या स्वरूपात मेघगर्जनेसह वादळी पाऊस होऊ शकतो. परंतु, हा पाऊस सर्वव्यापी नसल्यामुळे तो पेरणीसाठी पूरक ठरणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे, राज्यातील कमाल तापमान किमान १२ जूनपर्यंत उच्च पातळीवरच राहण्याची शक्यता आहे. यामध्ये विदर्भ आणि खानदेशात तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पार जाण्याचा अंदाज असून, मराठवाड्यात ते ३५ ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान राहील. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागणार आहे.

या पार्श्वभूमीवर, आगामी वादळी पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, अशी सूचना देण्यात आली आहे. तसेच, दुपारनंतर होणाऱ्या मेघगर्जनेच्या काळात नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. विजांचा कडकडाट होत असताना झाडांखाली, टिनशेडखाली किंवा विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे पूर्णपणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 411
आवाहन पाऊस मान्सून शेती हवामान
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; संगमनेरमध्ये प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

July 21, 2026

जंतरमंतरवर हायव्होल्टेज ड्रामा: सोनम वांगचुक रुग्णालयात दाखल; अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात… रात्री काय घडलं!

July 18, 2026

भाकरीच्या भुकेने आणि जगण्याच्या वेदनेतून निर्माण झालेले नारायण सुर्वे यांचे साहित्य माणसाला जगण्याची ताकद देते : ज्येष्ठ संपादक उत्तम कांबळे

July 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

अहिल्यानगरमध्ये रविवारी रंगणार ऐतिहासिक सोहळा; बोल्हेगाव फाटा स्वामी समर्थ केंद्रात २५ हजार भाविकांचे सामूहिक स्वामी चरित्र पारायण

By अनंत पांगारकरJuly 23, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर (विशेष प्रतिनिधी): अहिल्यानगर शहरातील बोल्हेगाव फाटा परिसरातील संत तुकाराम नगर…

आज, गुरुवार २३ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 23, 2026

विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध; सरकारच्या निषेधार्थ मशाल मोर्चात संगमनेरकर एकवटले, रस्त्यावर उतरले; बाळासाहेब थोरातांसह सर्व समविचारी पक्षीयांचा समावेश

July 22, 2026

महाविकास आघाडी आक्रमक; NEET पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीमाराविरोधात शुक्रवारी राज्यभर निदर्शने

July 22, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.