Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आरोग्य प्रश्नी सत्यजीत तांबे ‘ॲक्शन मोड’वर; आरोग्यमंत्र्यांकडे प्रलंबित कामांचा केला पाठपुरावा!
राजकारण

आरोग्य प्रश्नी सत्यजीत तांबे ‘ॲक्शन मोड’वर; आरोग्यमंत्र्यांकडे प्रलंबित कामांचा केला पाठपुरावा!

नागरिकांच्या आरोग्य सेवेसंदर्भातील प्रत्येक प्रश्न सुटेपर्यंत आपला हा लढा आणि पाठपुरावा सुरूच राहील, असा ठाम विश्वास आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई, विशेष प्रतिनिधी –

संगमनेर आणि सिन्नर मतदारसंघातील आरोग्य सुविधांचे प्रलंबित प्रश्न आणि सर्वसामान्यांच्या आरोग्याशी निगडित ट्रॉमा सेंटर, महिला रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांच्या कामात होणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि प्रशासकीय विलंबाबाबत आज आमदार सत्यजित तांबे यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे लक्ष वेधले. यावेळी त्यांनी प्रलंबित प्रश्नांसंदर्भात मंत्री आबिटकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

या भेटीदरम्यान आमदार सत्यजीत तांबे यांनी प्रामुख्याने सिन्नर-वावी ग्रामीण रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरचा विषय लावून धरला. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी मंजूर झालेल्या या सेंटरचे काम अद्यापही सुरू न झाल्याने अपघातग्रस्तांना वेळेवर उपचार मिळत नाहीत, परिणामी अनेकांना आपले प्राण गमवावे लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. विशेष म्हणजे, या विषयावर आमदार तांबे यांनी २६ जुलै २०२३ च्या पावसाळी अधिवेशनापासून ते १६ जुलै २०२५ च्या अधिवेशनापर्यंत सातत्याने पाठपुरावा केला आहे. तत्कालीन आरोग्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतरही प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

तसेच, ३ नोव्हेंबर २०२० रोजी संगमनेर नगरपरिषदेच्या कुटीर रुग्णालयाच्या आवारात मंजूर झालेल्या स्वतंत्र महिला रुग्णालयाबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. हे रुग्णालय तातडीने सुरू करण्याची मागणी करतानाच, मौजे खांडगाव (ता. संगमनेर) येथे जागा उपलब्ध असूनही रखडलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या कामाबाबतही त्यांनी चर्चा केली. ग्रामीण भागातील महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना उपचारांसाठी शहरात धाव घ्यावी लागत असल्याने हे प्रकल्प प्राधान्याने पूर्ण होणे गरजेचे असल्याचे तांबे यांनी सांगितले.

यावेळी महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीत येणाऱ्या त्रुटी आणि रुग्णालय स्तरावर लाभार्थ्यांना होणाऱ्या त्रासावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. आमदार सत्यजीत तांबे यांनी मांडलेल्या या सर्व मागण्यांची दखल घेत, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून यावर तातडीने प्रशासकीय कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

नागरिकांच्या आरोग्य सेवेसंदर्भातील प्रत्येक प्रश्न सुटेपर्यंत आपला हा लढा आणि पाठपुरावा सुरूच राहील, असा ठाम विश्वास आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 567
आरोग्य प्रकाश आबिटकर बैठक सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.