शेवगाव | महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पोलिसांनी आखेगाव रोडवर सापळा रचून एका इसमास बेकायदेशीर देशी बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतुसांसह अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी विना नंबरची स्कॉर्पिओ गाडी आणि मोबाईल असा एकूण २० लाख २५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १२ फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, आखेगाव रोडने एका काळ्या रंगाच्या विना नंबरच्या स्कॉर्पिओमधून एक व्यक्ती देशी बनावटीचे पिस्तुल घेऊन शेवगावकडे येत आहे. या माहितीची दखल घेत पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने हॉटेल रिलॅक्स इन परिसरात नाकाबंदी केली. संशयित वाहन अडवून झडती घेतली असता, चालक जावेद मुनिर सय्यद (वय २७, रा. भापकर वस्ती, शेवगाव) याच्याकडे एक गावठी कट्टा, एक मॅग्झीन आणि दोन जिवंत काडतुसे सापडली.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. जप्त केलेल्या मालामध्ये १९ लाख रुपयांची स्कॉर्पिओ आणि दोन महागड्या मोबाईलचा समावेश आहे. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव पोलिसांनी यशस्वीपणे पार पाडली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामहरी खेडकर करत आहेत.
पोलिसांची मोठी कारवाई; पिस्तुल व स्कॉर्पिओसह २० लाखांचा मुद्देमाल जप्त
संशयित वाहन अडवून झडती घेतली असता, चालक जावेद मुनिर सय्यद (वय २७, रा. भापकर वस्ती, शेवगाव) याच्याकडे एक गावठी कट्टा, एक मॅग्झीन आणि दोन जिवंत काडतुसे सापडली.







