Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गावठी कट्ट्याचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश; तिघे जेरबंद
गुन्हेगारी

गावठी कट्ट्याचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश; तिघे जेरबंद

पोलिसांनी अनिकेत शामवेल शिंदे (वय २२, रा. देहूरोड, पुणे) याच्यासह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. 
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 
अहिल्यानगर :
पाथर्डी शहरातील माणिकदौंडी चौक परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास गावठी कट्ट्याचा धाक दाखवून एका युवकाला मारहाण करत त्याची दुचाकी आणि रोकड लुटणाऱ्या दरोडेखोरांना पाथर्डी पोलिसांनी तातडीने बेड्या ठोकल्या आहेत. या धाडसी कारवाईत पोलिसांनी पाचपैकी तिघा आरोपींना अटक केली असून, यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. फरार असलेल्या इतर दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, माणिकदौंडी चौक परिसरातील फ्लेक्स व्यावसायिक अमिर हबिब शेख हे २२ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास बॅनर लावण्यासाठी घराबाहेर पडले असता, त्यांच्या दुचाकीची वायर तोडत असलेल्या पाच संशयितांना त्यांनी हटकले. यावेळी आरोपींनी शेख यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. 
इतक्यावरच न थांबता एका आरोपीने कंबरलेला गावठी कट्टा काढून शेख यांच्या डोक्याला लावत गोळी झाडण्याची धमकी दिली. या दहशतीखाली शेख यांच्याकडून ६५० रुपयांची रोकड आणि त्यांची दुचाकी हिसकावून आरोपी पसार झाले.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विलास जाधव व त्यांच्या पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी अनिकेत शामवेल शिंदे (वय २२, रा. देहूरोड, पुणे) याच्यासह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. 
अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे आणि चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत केल्या आहेत. तपासात आरोपींनी गुन्ह्यासाठी वापरलेली पल्सर गाडी देखील चोरीची असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक कल्लूबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी पोलिसांनी यशस्वीरित्या पार पाडली. न्यायालयाने सज्ञान आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 239
गुन्हेगारी पाथर्डी पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- वैद्यकीय क्षेत्र हे केवळ व्यवसाय नसून समाजसेवेचे एक अत्यंत प्रभावी माध्यम…

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.