Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अर्धन्यायिक सुनावणी संपवून बाहेर आला अन् चहाच्या टपरीवर लाच घेताना ACB च्या जाळ्यात तहसीलचा लिपिक अडकला, आठवडाभरात दुसरी मोठी कारवाई
गुन्हेगारी

अर्धन्यायिक सुनावणी संपवून बाहेर आला अन् चहाच्या टपरीवर लाच घेताना ACB च्या जाळ्यात तहसीलचा लिपिक अडकला, आठवडाभरात दुसरी मोठी कारवाई

वारंवार होणाऱ्या या कारवायांमुळे संगमनेर महसूल विभागाची प्रतिमा मलीन होत असून, जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कडक पावले उचलावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी –
संगमनेरच्या तहसील कार्यालयातील लिपिक कैलास विठ्ठल खाडे (रा. अकोले) याला १३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अहिल्यानगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी रंगेहात पकडले. अवघ्या आठवडाभरात महसूल विभागात झालेली ही दुसरी मोठी कारवाई असल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
समजलेल्या माहितीनुसार, एका तक्रारदाराला त्यांच्या मालमत्तेचा वाटप पत्राचा आदेश करून हवा होता. यासाठी आवश्यक असलेली सर्व कायदेशीर कागदपत्रे पूर्ण असतानाही, लिपिक कैलास खाडे याने या कामासाठी १३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने वारंवार विनंती करूनही खाडे लाचेच्या मागणीवर ठाम होता. अखेर कंटाळून तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.
तक्रारीची शहानिशा केल्यानंतर, गुरुवारी २६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयाच्या परिसरात सापळा रचण्यात आला. दरम्यान तहसील कार्यालयामध्ये १५५ अन्वये अर्धन्यायिक सुनावणीचे काम आटोपून बाहेर आलेल्या लाचखोर लिपिक खाडे याने एका चहाच्या टपरीवर तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारली. पैसे मोजत असतानाच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला बेड्या ठोकल्या.
या कारवाईनंतर स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. आरोपी खाडे यापूर्वी अकोले तहसीलमध्ये कार्यरत असतानाही त्याच्याबाबत तक्रारी होत्या, अशी माहिती समोर येत आहे. संगमनेरमध्ये गेल्या काही दिवसांपासून महसूल विभागातील भ्रष्टाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, काही दिवसांपूर्वीच एका तलाठ्यावरही कारवाई झाली होती. वारंवार होणाऱ्या या कारवायांमुळे संगमनेर महसूल विभागाची प्रतिमा मलीन होत असून, जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कडक पावले उचलावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,318
एसीबी कैलास खाडे लाचखोरी लाचलुचपत संगमनेर तहसील
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- वैद्यकीय क्षेत्र हे केवळ व्यवसाय नसून समाजसेवेचे एक अत्यंत प्रभावी माध्यम…

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.